CoronaVirus News: १२ दिवसांमध्ये नवी मुंबईत वाढले १० हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 01:54 AM2021-04-07T01:54:58+5:302021-04-07T01:55:13+5:30

आरोग्य विभागावरील ताण वाढला

CoronaVirus News: 10,000 patients increased in Navi Mumbai in 12 days | CoronaVirus News: १२ दिवसांमध्ये नवी मुंबईत वाढले १० हजार रुग्ण

CoronaVirus News: १२ दिवसांमध्ये नवी मुंबईत वाढले १० हजार रुग्ण

googlenewsNext

- नामदेव मोरे

नवी मुंबई : शहरामध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल १० हजार २४३ रुग्ण वाढले असून फक्त ४,६९१ जण बरे झाले आहेत. आरोग्य विभागावरील ताण वाढला असून रुग्णालयांमध्ये आयसीयू व व्हेंटीलेटर्स विभागात जागा मिळेना झाली आहे. मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे.   
नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरली आहे. सर्वच विभागांमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे राहिले आहे. ३ एप्रिलपासून प्रतिदिन १ हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. २५ मार्चपासून शहरात तब्बल १०,२४३ रुग्ण वाढले आहेत. या तुलनेमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. दहा दिवसांमध्ये ४,६९१ जणच बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून ९,१५४ झाली आहे. रुग्णालयांमध्ये जागा कमी असल्यामुळे जास्त लक्षणे नसणा-यावर घरामध्येच उपचार सुरू केले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही कमी होऊ लागला आहे. जानेवारीमध्येे दुपटीचा कालावधी ६०० दिवसांवर गेला होता. तो कमी होऊन ५२ दिवसांवर आला असून त्यामुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे. दोन महिन्यापूर्वी प्रतिदिन १ किंवा २ जणांचा मृत्यू होत होता. काही वेळा मृत्यृची संख्या शून्यावर आली होती. परंतु मागील १० दिवसांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु अनेक नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. नियमांचे उल्लंघन करणा-यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

दहा दिवसांमधील काेरोनाची स्थिती
तारीख     रूग्ण    कोरोनामुक्त
२५ मार्च    ६८१    १५९
२६ मार्च    ६१०    २७३
२७ मार्च    ७७०    २६७
२८ मार्च     ७१७    २४७
२९ मार्च    ४९२    ३१३
३० मार्च    ६९०    ३६८
३१ मार्च    ५५४    ३७१
१ एप्रिल    ९७१    ४०३
२ एप्रिल    ९७७    ४७२
३ एप्रिल    १२०५    ६२७
४ एप्रिल    १४४१    ५१८
५ एप्रिल    ११३५    ६७३

विभागवार सक्रिय रुग्णांचा तपशील
विभाग    रुग्ण
बेलापूर    १७०१
ऐरोली    १३८१
नेरुळ    १४५५
कोपरखैरणे     १२५६
वाशी                 १२२८
तुर्भे                 ९८३
घणसोली    ९१८
दिघा                 २३२

Web Title: CoronaVirus News: 10,000 patients increased in Navi Mumbai in 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.