CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:10 AM2020-08-20T01:10:07+5:302020-08-20T01:10:27+5:30

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपेक्षा जास्त झाली असून, कोरोना बळींची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे.

CoronaVirus News: 2,494 deaths in five months, the highest number of deaths due to other diseases | CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त

CoronaVirus News: पाच महिन्यांत २,४९४ मृत्यू, इतर आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त

Next

योगेश पिंगळे
नवी मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पाच महिन्यांमध्ये नवी मुंबईमध्ये २,४९४ जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च ते ३१ जुलैदरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४१८ आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजार व वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्यांची संख्या २,0७६ असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जबाजारी, आर्थिक चणचण व इतर मानसिक दबावामुळे हृदयविकाराचा झटका येऊनही अनेकांचा मृत्यू झाला आहे. इतर आजारांच्या रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपेक्षा जास्त झाली असून, कोरोना बळींची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. एकूण रु ग्णांपैकी अडीच टक्के
रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना बळींचा एकत्रिक आकडा जास्त वाटत असला, तरी प्रत्यक्षात मात्र इतर आजार व नैसर्गिक मृत्यू झालेल्यांच्या तुलनेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या खूपच कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान पाच महिन्यांमध्ये नवी मुंबईमध्ये जवळपास २,४९४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद विभाग कार्यालयामध्ये झाली आहे. यामध्ये बेलापूर विभागात ३९८, नेरु ळ विभागात ३६१, वाशी ९४७, तुर्भे १५८, कोपरखैरणे ३१५, घणसोली १३५ व ऐरोलीसह दिघा परिसरात १८0 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पाच महिन्यांमध्ये कोरोनामुळे शहरातील ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त २,0७६ जणांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल व इतर ठिकाणावरून नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कोरोना
रु ग्णांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत असून, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पाच महिने अनेक व्यवसाय बंद होेते. रोजगार ठप्प झाल्यामुळे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. आर्थिक चणचण भासू लागली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पुरेसा पैसा अनेकांकडे नाही. यामुळे अनेकांचा मानसिक ताण वाढला आहे. यामुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका आहे. काहींनी आत्महत्याही केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेक खासगी रु ग्णालयांनी दवाखाने बंद केले. यामुळे गंभीर आजारी असणाऱ्यांवर वेळेत उपचार होऊ शकले नाहीत. योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.
महानगरपालिका प्रशासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच त्या व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सक्षम
करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
>शहरातील नॉन कोविड रु ग्णालयात ज्या सुविधा कमी पडत आहेत, त्याबाबत वारंवार मागणी केली जात आहे. त्या अनुषंगाने सध्या जी नॉन कोविड रु ग्णालये सुरू आहेत, ती पूर्ण क्षमतेने सुरू करणे आणि जी नॉन कोविड रु ग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू नसतील, ती त्यांच्यामध्ये पुन्हा बदल करण्याचा आपल्याकडे पर्याय आहे. त्या पद्धतीने काम सुरू आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आपल्याकडे सुविधा किती आहेत आणि अतिरिक्त कुठल्या बनणार आहेत, त्या आधारावर एखादे कोविड रुग्णालय नॉन कोविड करण्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
>कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, ते मानसिक दबावाखाली आहेत. कोरोनाची लागण झाली, तर आपण एकटे पडू का? आपल्याला मदत आणि योग्य उपचार मिळतील का? मृत्यू तर होणार नाही ना? असे अनेक विचार नागरिकांच्या मनात घर करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही तणावाखाली राहू नये. आता उपचाराच्या सुविधा वाढल्या असून, रु ग्णालयांमधील कामाची गतीही वाढली आहे. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची लक्षणे असल्यास किंवा इतर कोणत्याही आजाराचे उपचार करण्यासाठी रु ग्णालयात गेले पाहिजे. आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ
>भिकाºयांचाही मृत्यू : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर भिकारी व निराधार व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना पुरेसे अन्न उपलब्ध होत नसल्याने, त्यांची उपासमार होत होती. यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याविषयी एकत्रित आकडा उपलब्ध नसला, तरी एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास पाच निराधारांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: CoronaVirus News: 2,494 deaths in five months, the highest number of deaths due to other diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.