CoronaVirus News : नवी मुंबईत ३२१ रुग्ण वाढले, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:46 AM2020-06-25T04:46:21+5:302020-06-25T04:46:37+5:30
शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये बुधवारी तब्बल ३२१ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या ५३९३ झाली आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८५ जण बरे झाले. शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. बुधवारी ऐरोलीत ८२, नेरूळमध्ये ५१, बेलापूरमध्ये ३३, कोपरखैरणेत ४१, वाशीत २५, घणसोलीत ५४, तुर्भेमध्ये १६ व दिघामध्ये १९ जणांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एका दिवशी त्रिशतक झाले असून शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाला असून ८४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३०८६ रुग्ण बरे झाले आहेत. २१२७ जणांवर उपचार सुरू असून अद्याप ८२४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
>रायगड जिल्ह्यात १४२ रुग्ण
अलिबाग : रायगड जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २७४६ वर पोहोचली
आहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण १८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बुधवारी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ९५, पनवेल ग्रामीणमध्ये २७, उरण १०, कर्जत, पेण, मुरुड प्रत्येकी १, खालापूर ४, रोहा ३ असे एकूण १४२ रु ग्ण आढळून आले. सद्य:स्थितीत ७९४ पॉझिटिव्ह
रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.