शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

CoronaVirus News: शाळांसंबंधी तक्रार करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:20 AM

पालक चिंतित : शाळा बंद असतानाही शुल्काची होतेय मागणी

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे आॅनलाइन शिक्षणावर भर दिला जात असताना दुसरीकडे पालकांवर शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालक चिंतित असल्याने खासगी शाळा व पालक यांच्यात समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शिक्षण व्यवस्थेवरदेखील परिणाम झाला आहे. तर अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरत असल्याने पुढील काही महिने शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. अनेक पालक तीन महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असतानाही शाळांकडून शुल्क भरण्याचा तगादा लावला जात आहे. तर शिक्षण विभागाकडूनदेखील ही बाब दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे खासगी शाळा व चिंतित पालक यांच्यात योग्य चर्चेसाठी समन्वय अधिकारी नेमण्याची मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. त्याकरिता पालिका शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, निखिल गावडे आदी उपस्थित होते. लॉकडाऊन संपेपर्यंत अथवा त्यानंतरच्या काही काळापर्यंत पालकांवर शुल्क भरण्यासाठी शाळांकडून दबाव टाकला जाऊ नये, अशीदेखील मागणी त्यांनी या वेळी केली.आर्थिक पिळवणूककोरोनामुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने आॅनलाइन शिक्षणावर भर दिला जात असून त्याकरिता विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित केले जात आहे. परंतु काही खासगी शाळांनी त्यातही पालकांची आर्थिक पिळवणूक चालवल्याच्या तक्रारी येत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या