- योगेश पिंगळे नवी मुुंबई : कोरोनामुळे या वर्षी शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या नसून, याचा फटका क्रीडापटूंना बसला आहे. त्यामुळे त्यांच्या क्रीडा प्रगतीला खीळ बसली असून, खेळाडूंचे वर्ष वाया गेले आहे.खेळाडूंना विविध खेळांच्या माध्यमातून वाव मिळावा, कला दाखविण्याची संधी उपलब्ध व्हावी, तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळ खेळून देशाचे नाव उंचवावे. यासाठी केंद्र शासनाच्या स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया या उपक्रमांतर्गत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महापालिकेला जिल्हास्तरीय स्पर्धा खेळविण्याचा दर्जा दिला आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात २००८ सालापासून महानगर पालिका क्षेत्रात शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी विविध ५८ खेळाच्या प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये नवी मुंबई शहरातील सुमारे २१९ शाळांमधील ३० हजार खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्र्ीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळते. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधी या स्पर्धा घेतल्या जातात. या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. यामुळे विविध खेळांमध्ये करियर करण्याची इच्छा असलेल्या शालेय खेळाडूंना मोठा फटका बसला आहे.‘खेलो इंडिया’मधील संधी हुकलीशालेय खेळाडूंसाठी केंद्राकडून विविध १६ खेळ प्रकारांसाठी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. या विजेत्या स्पर्धकांची निवड करून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले जाते.नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी चार शालेय खेळाडूंची निवड झालेली आहे. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक खेळाडूंची संधी हुकली आहे.
CoronaVirus News: शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना कोरोनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 11:27 PM