CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:04 AM2020-06-27T00:04:15+5:302020-06-27T00:04:43+5:30

नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

CoronaVirus News: Government's childish game regarding transfer of commissioners- Darekar | CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर

CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर

Next

नवी मुंबई : राज्यातील काही महापालिकांमध्ये पाच-सहा महिन्यांपूर्वी आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, परंतु कोरोनाच्या जबाबदारीच्या निमित्ताने पुन्हा आयुक्तांच्या बदल्या केल्या जात असून, सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालविला असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी बदल्या झालेल्या आयुक्तांच्या कोरोनामुळे बदल्या करण्यामागे सरकारमधील तीन पक्षांची वाटमारी दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. बदल्यांमुळे त्या ठिकाणची व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरायचे असेल, तर संबंधित मंत्री आणि पालकमंत्र्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. त्यांनाही तुम्ही बदलणार का, असा सवाल त्यांनी केला.
नवी मुंबई शहरातील कोविड रुग्णालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांची दरेकर यांनी पाहणी केली. कोरोना परिस्थितीवर पालिका आयुक्तांनी केलेल्या सादरीकरणातून उपाययोजना करण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न आहे, परंतु अंमलबजावणी आणि आवश्यक गोष्टींची कमतरता असल्याचे ते म्हणाले. या दौºयामुळे नवी मुंबई पालिकेची आरोग्य व्यवस्था गतिशील होईल, यंत्रणेत फरक पडेल, अशी अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली.
येत्या आठ दिवसांत यंत्रणेला गती न आल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, रमेश पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक आदी उपथित होते.
>आकडेवारी लपवून काही साध्य होणार नाही
अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत झालेले रुग्ण यांच्या आकडेवारीत तफावत आहे. अपयश झाकण्यासाठी आकडेवारी लपवून काही साध्य होणार नाही. आकडेवारी वाढत असल्याचा दोष आम्ही सरकारला देत नाही, परंतु ती लपविण्याचा नादात भीषण परिस्थिती उद्भवली, तर ती कंट्रोल करता येणार नसल्याचे दरेकर म्हणाले.

Web Title: CoronaVirus News: Government's childish game regarding transfer of commissioners- Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.