शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

CoronaVirus News: आयुक्तांच्या बदल्यांबाबतीत सरकारचा पोरखेळ- दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:04 AM

नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवी मुंबई : राज्यातील काही महापालिकांमध्ये पाच-सहा महिन्यांपूर्वी आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, परंतु कोरोनाच्या जबाबदारीच्या निमित्ताने पुन्हा आयुक्तांच्या बदल्या केल्या जात असून, सरकारने बदल्यांचा पोरखेळ चालविला असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. नवी मुंबई शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर शुक्रवारी नवी मुंबईत आले . त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.काही दिवसांपूर्वी बदल्या झालेल्या आयुक्तांच्या कोरोनामुळे बदल्या करण्यामागे सरकारमधील तीन पक्षांची वाटमारी दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. बदल्यांमुळे त्या ठिकाणची व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरायचे असेल, तर संबंधित मंत्री आणि पालकमंत्र्यांनाही जबाबदार धरले पाहिजे. त्यांनाही तुम्ही बदलणार का, असा सवाल त्यांनी केला.नवी मुंबई शहरातील कोविड रुग्णालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांची दरेकर यांनी पाहणी केली. कोरोना परिस्थितीवर पालिका आयुक्तांनी केलेल्या सादरीकरणातून उपाययोजना करण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न आहे, परंतु अंमलबजावणी आणि आवश्यक गोष्टींची कमतरता असल्याचे ते म्हणाले. या दौºयामुळे नवी मुंबई पालिकेची आरोग्य व्यवस्था गतिशील होईल, यंत्रणेत फरक पडेल, अशी अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली.येत्या आठ दिवसांत यंत्रणेला गती न आल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, रमेश पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक आदी उपथित होते.>आकडेवारी लपवून काही साध्य होणार नाहीअनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत झालेले रुग्ण यांच्या आकडेवारीत तफावत आहे. अपयश झाकण्यासाठी आकडेवारी लपवून काही साध्य होणार नाही. आकडेवारी वाढत असल्याचा दोष आम्ही सरकारला देत नाही, परंतु ती लपविण्याचा नादात भीषण परिस्थिती उद्भवली, तर ती कंट्रोल करता येणार नसल्याचे दरेकर म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस