CoronaVirus News: रुग्णखाटांच्या उपलब्धतेसाठी हेल्पलाइन; नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास कॉल सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:44 AM2021-04-06T01:44:35+5:302021-04-06T01:44:49+5:30

नवी मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचारासाठी रुग्णखाटा उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

CoronaVirus News: Helpline for hospital availability | CoronaVirus News: रुग्णखाटांच्या उपलब्धतेसाठी हेल्पलाइन; नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास कॉल सेंटर सुरू

CoronaVirus News: रुग्णखाटांच्या उपलब्धतेसाठी हेल्पलाइन; नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास कॉल सेंटर सुरू

Next

नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढला आहे. रुग्णालयात जागा मिळविण्यासाठी सुरू असलेली कसरत थांबविण्यासाठी महानगरपालिकेने हेल्पलाइन सुरू केली असून, रुग्णांच्या सुविधेसाठी मनपाचे कॉल सेंटर चोवीस तास सुरू राहणार आहे.           

 नवी मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचारासाठी रुग्णखाटा उपलब्ध करून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्स खाटा उपलब्ध होत नाहीत. उपचारासाठी रुग्णांना दाखल करण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. २७५६७४६० हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. चोवीस तास हा नंबर सुरू राहणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कॉल सेंटरमधील डॉक्टर्स रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन त्यांना रुग्णवाहिका, रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

महानगरपालिकेने यापूर्वी रुग्णखाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती देण्यासाठी संकेतस्थळावर डॅशबोर्ड तयार केला आहे. परंतु सदर डॅशबोर्डवर माहिती अनेक रुग्णालयांकडून वेळेत अद्ययावत केली जात नव्हती. यामुळे डॅशबोर्डवर रुग्णालयांमध्ये खाटा असल्याचे दाखवले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र खाटा उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होत होती. ही गैरसाेय दूर करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे.

त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करा
महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. रुग्णालयीन व्यवस्थेवरील ताण वाढत असून, नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

Web Title: CoronaVirus News: Helpline for hospital availability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.