शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

CoronaVirus News: कळंबोलीत कोविड हॉस्पिटल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:43 AM

पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : सिडकोच्या माध्यमातून पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या उपचाराकरिता कोट्यवधी  रुपये खर्च करून, कळंबोली येथे कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे.  बुधवारपासून रुग्णालय सुरू केले असून, सध्या ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यात येत आहे. तर लवकरच अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील कोविड रुग्णांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रुग्णालय सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी दोन रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे.पनवेल पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज पाचशेच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. यासाठी पनवेल परिसरात उपजिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर कोन येथील  इंडिया बुल्ससह खासगी १८ रुग्णालयांत कोविडवर उपचार करण्यात येत आहे, तरी नागरिकांना बेडची कमतरता भासत आहे. पनवेल परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी  सिडकोने कळंबोली  समाज मंदिरात पाच कोटी रुपये खर्च करून  कोविड रुग्णालयाची उभारणी केली. २ एप्रिल रोजी या रुग्णालयाचे राज्याचे नगरविकासमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले आहे. हे केंद्र चालवण्यासाठी मॅजिक डिल या संस्थेची निवड केली आहे.   या रुग्णालयात अतिदक्षता १२ आणि ६० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे. बुधवारी ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यास सुरुवात केली असून,  गुरुवारपासून अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.