CoronaVirus News in Navi Mumbai: नवी मुंबईत आढळले २० नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या २५०
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:37 AM2020-05-02T05:37:03+5:302020-05-02T05:37:19+5:30
शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोरोनाचा धोका वाढला आहे. शुक्रवारी नवी मुंबईत २० रूग्ण आढळले आहेत. त्शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या २५० झाली असून त्यामध्ये बाजार समितीमधील २६ जणांचा समावेश आहे.
शुक्रवारी भाजी मार्केटमधील एक व्यापारी व एक कामगारास कोरोनाची लागण झाली. फळ मार्केट मधील एक व्यापाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. धान्य मार्केटमध्ये तीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये एक लेखनिक, सेल्समन व दलालाचा ही समावेश आहे. आतापर्यंत एपीएमसीतील २६ जणांना लागण झाली आहे. एपीएमसीच्या बाहेर फळ विक्री करणाºया विक्रेत्यालाही लागण झाली आहे. धान्य मार्केटमध्ये यापूर्वी कोरोना झालेल्या व्यापाºयाच्या घरातील सहा जण व भाजी मार्केट मधील व्यापाºयाच्या मित्रासही प्रादुर्भाव झाला आहे. मार्केटमधील रुग्णांमुळे शहरातील दहा रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीमध्ये व त्यामुळे शहरात वाढणाºया रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्ण सापडलेली विंग सील केली जात असून निजंर्तुकिकरण केले जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी २०रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या २५० झाली आहे. दिवसभरात नेरूळ मध्ये ४, वाशीमध्ये ३, तुर्भेमध्ये ७ व कोपरखैरणेमध्ये ६ रूग्ण आढळले.
।आवक झाली कमी
कोरोनामुळे बाजार समिती मधील आवक कमी होऊ लागली आहे. भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी फक्त ९५ वाहनांची आवक झाली. शनिवारीही अनेक भाजी व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये माल आणण्यापेक्षा थेट मुंबईत पाठविण्यावर भर दिला जात आहे.