CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईत ५८ नवीन रुग्ण; शहरात १६ कोरोनामुक्त,दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:04 AM2020-05-22T01:04:36+5:302020-05-22T01:04:51+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

CoronaVirus News in Navi Mumbai :58 new patients in Navi Mumbai; 16 corona-free in the city, both died | CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईत ५८ नवीन रुग्ण; शहरात १६ कोरोनामुक्त,दोघांचा मृत्यू

CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईत ५८ नवीन रुग्ण; शहरात १६ कोरोनामुक्त,दोघांचा मृत्यू

Next

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुरुवारी ५८ नवीन रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या १,४२२ झाली आहे. तर, दोघांचा मृत्यू झाला असून
१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नेरुळमध्ये १४, कोपरखैरणेत १३, ऐरोलीत ९, तुर्भे व घणसोलीमध्ये प्रत्येकी ५, व बेलापूर, वाशी, दिघा विभागात प्रत्येकी ४ रुग्ण आढळले. सर्वाधिक ३१९ रुग्ण तुर्भे सानपाडा परिसरात असून सर्वांत कमी ५७ रुग्ण दिघा विभागात आहेत. १६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची संख्या ५४८ झाली आहे.
तुर्भे व घणसोली परिसरात दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबळींची संख्या ४७ झाली आहे. मृतांचा आकडा रोज वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

पनवेलमध्ये दोघांचा मृत्यू
पनवेलमध्ये गुरुवारी २५ नवे रुग्ण आढळले. यात १३ पालिका हद्दीत तर १२ ग्रामीण भागातील आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये कळंबोलीतील ६५ वर्षीय व कामोठेमधील ४५ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे.

Web Title: CoronaVirus News in Navi Mumbai :58 new patients in Navi Mumbai; 16 corona-free in the city, both died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.