नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. दुसरीकडे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाने शनिवारपासून सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांनी घरी थांबावे, असे आवाहन केले आहे.बाजार समितीमध्ये आतापर्यंत २० रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी भाजीपाला मार्केटमधील दोन व्यापारी, एक धान्य व्यापारी व दोन कामगार असे ५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना झालेल्या व्यापाºयाची पत्नी, मुलगा, व कामगारासही कोरोना झाला आहे.तर, पनवेलमध्ये गुरुवारी पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. यापैकी २८ रुग्ण बरे झाले आहेत.
CoronaVirus News in Navi Mumbai: मुंबई बाजार समिती सुरूच राहणार, प्रशासनाचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 4:38 AM