नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये शनिवारी एकाच दिवशी ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्यांची संख्या ३६७ झाली आहे. नवीन ८० रु ग्ण आढळले असून कोरोनाबाधितांची संख्या १,१२८ झाली आहे.शनिवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कोपरखैरणेमध्ये एक व तुर्भे परिसरातील दोघांचा समावेश आहे. कोरोना बळींचा आकडा २६ वर पोहोचला आहे. दिवसभरात ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तुर्भे सानपाडामध्ये २५, कोपरखैरणेत १५, नेरुळमध्ये १२, वाशीमध्ये ९, ऐरोली व बेलापूरमध्ये ६, घणसोलीत ७ रुग्ण आढळले. अद्याप ९१३ अहवाल प्रलंबित आहेत.शहरातील एकाच दिवशी ९५ रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांचे ते राहत असलेल्या सोसायटीमध्ये टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. शनिवारी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण जास्त असल्याने शहरवासीयांना अल्पसा दिलासा मिळाला आहे.
CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईत एकाच दिवशी ९५ रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 5:47 AM