CoronaVirus News in Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू; ७४ रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:20 AM2020-05-19T00:20:16+5:302020-05-19T00:21:06+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या ३८ झाली आहे. मृतांमध्ये एपीएमसीशी संबंधित तिघांचा समावेश आहे. शहरात एकाच दिवशी ७४ रुग्ण वाढले असून तेवढेच कोरोनामुक्तही झाले आहेत.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा व भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचाही समावेश आहे. एपीएमसीमधील व्यापाºयाच्या आजीचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक १० जण तुर्भे सानपाडा परिसरातील आहेत. मृतांचा वाढता आकडा चिंतेची बाब झाली आहे.
नवी मुंबईमध्ये ७४ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या १२६४ झाली आहे. सर्वाधिक २९१ रूग्ण तुर्भे- सानपाडा परिसरातील आहेत. दिघा वगळता उर्वरित सात विभागामध्ये कोरोना चे शतक पूर्ण झाले आहे.
दिवसभरात ७४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४८३ झाली आहे. नवी मुंबईतील रूग्णसंख्या वाढत असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे. लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.