पनवेल : पनवेलहून मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी जात असलेल्यांपैकी काहींना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ८० टक्के हेच कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे पनवेल परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संबंधितांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा, अन्यथा ३ मे नंतर पनवेलमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करू, असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात जे रुग्ण सापडले आहेत त्यांना या विषाणूंचे संक्रमण पनवेलबाहेर झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पनवेल शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी पनवेलबाहेर अत्यावश्यक सेवा देणाºया शासकीय व खासगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळ करावी, अशी मागणी आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. राज्य सरकारने पनवेल परिसरातून मुंबईत अत्यावश्यक सेवेकरिता जाणाºयांची काही व्यवस्था केली नाही तर पनवेल पालिका क्षेत्रातील मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद करू, असे सूचित के ले आहे.।संमिश्र प्रतिक्रियाआ. प्रशांत ठाकूर यांच्या मागणीला काही नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींच्या मते अत्यावश्यक सेवा देणाºया नागरिकांच्या मागे ठाम उभे राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मागणीने या नागरिकांचे खच्चीकरण होण्याची शक्यता असल्याचे मत काहींनी व्यक्त के ले.
CoronaVirus News in Navi Mumbai: अत्यावश्यक सेवेकऱ्यांना मुंबईतच थांबवा- प्रशांत ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 1:18 AM