शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVirus News : बेडसाठी होतोय दबावाचा वापर, रुग्णालय व्यवस्थापन हतबल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:20 AM

CoronaVirus News: दुसऱ्या रुग्णाच्या जीविताशी खेळ करत मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळविण्यासाठी इतर रुग्णांना हलवण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णामुळे उपलब्ध सुविधांवर ताण पडू लागला आहे. परिणामी रुग्णाला उपचार मिळवण्यासाठी दबावानंतरचा वापर होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. दुसऱ्या रुग्णाच्या जीविताशी खेळ करत मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळविण्यासाठी इतर रुग्णांना हलवण्याचे प्रकार घडू लागले आहेत.नवी मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सद्य:स्थितीला नवी मुंबईत ११ हजारांच्या जवळपास कोविड रुग्णांवर रुग्णालयात तसेच घरी उपचार सुरू आहेत, तर बहुतांश रुग्णांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने खासगी रुग्णालयात देखील बेड मिळणे अवघड होत आहे. परिणामी राजकीय तसेच इतर व्यक्तींचा दबाव वापरून मर्जीतल्या रुग्णाला बेड मिळवण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यासाठी अगोदरच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यासाठी देखील दबाव टाकला जात आहे. असाच प्रकार सोमवारी रात्री कोपरखैरणे येथील एका खासगी रुग्णालयात घडला. तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला ऑक्सिजनवरून हलवून त्याठिकाणी नव्याने एका रुग्णाला दाखल करून घेण्याचा दबाव टाकला जात होता. रुग्णालय व्यवस्थापनाकडून असे करण्यास नकार दिला जात असतानाही, रुग्णाचे नातेवाईक राजकीय ताकद वापरून त्याठिकाणी बेड मिळवण्याच्या प्रयत्नात होते. हा प्रकार अगोदरच उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक व मित्रांच्या निदर्शनास आला. त्यांनी आपल्या रुग्णाला उपचार सुरू असलेल्या वॉर्डमधून हलवण्यास विरोध दर्शवला. अखेर नव्याने भरती झालेल्या रुग्णासाठी रुग्णालयाने स्वतंत्र सोय करून राजकीय दबावातून स्वतःची सुटका करून घेतली.

आयसीयू बेड कमीशहरात खासगी व पालिका रुग्णालयात आयसीयू बेडची उपलब्धता कमी पडू लागल्याने असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची वाढ होतच राहिल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस