CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:20 AM2020-06-24T00:20:33+5:302020-06-24T00:21:02+5:30

आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

CoronaVirus News : Will Abhijeet win over Corona? | CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

CoronaVirus News : अभिजीत मिळविणार का कोरोनावर जीत?

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समवेश झाला आहे. कोरोनाचा आकडा ५,०७२ झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबत नसल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती केली आहे. आता अभिजीत यांच्यासमोर कोरोनावर विजय मिळविण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
नवी मुंबईला कोरोनाचा विळखा पडला असताना, विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली आहे. १३ मार्चपासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. तीन महिन्यांत वाशीमध्ये १,२०० बेडचे नवीन रुग्णालय उभारण्यात आले. चारस्तरीय यंत्रणा उभारण्यात आली. विविध उपाययोजना राबविण्यात आल्या, परंतु दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच राहिली. २३ जूनला १११ रुग्ण वाढले असून, एकूण रुणांनी पाच हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. एकूण रुग्णसंख्या ५,०७२ झाली असताना, महानगरपालिकेचे तेविसावे आयुक्त म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये प्रतिदिन रुग्ण वाढत आहेत. तुर्भे विभागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९५६ झाली असून, लवकरच हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा परिसरामध्येही रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. झोपडपट्टी, अल्प उत्पन्न गटातील चाळी व गावठाण परिसरामध्ये दाट लोकवस्तीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नवीन आयुक्तांना कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहेत. त्याहीपेक्षा कोरोना व्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे आव्हान उभे राहिले आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. येथील रुग्णांना नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. नवी मुंबईमधील गरीब रुग्णांसाठी मनपाचे जनरल रुग्णालय सुरू करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरामध्ये रुग्णांची संख्या कमी करणे तितकेच गरजेचे बनले आहे.
>कठोर उपाययोजनांची गरज : शहरात कोरोना बळींची संख्या १७७ झाली आहे. मंगळवारी एका दिवसात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे, आॅक्सिजन बेडचे प्रमाण वाढविणे व तपासणीसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आव्हान नवीन आयुक्त कसे पेलणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
>मनपाच्या स्थापनेपासून आयुक्तांचा तपशील
आर. सी. सिन्हा
राजीव आग्रवाल
शंकर मेनन
आर. सी. सिन्हा
एम. रमेशकुमार
जी. बी. पिंगुळकर
जी. एस. गिल
जे. एम. फाटक
एस.एल. कुलकर्णी
सुभाषचंद्र भाकरे
पी. एस. मीना
मुकेश खुल्लर
सुनील सोनी
रमेश उबाळे
मधुकर कोकाटे
विजय नाहटा
भास्कर वानखेडे
ए. एल. जºहाड
दिनेश वाघमारे
तुकाराम मुंढे
डॉ. रामस्वामी एन.
अण्णासाहेब मिसाळ
अभिजीत बांगर
>नवी मुंबईमधील परिस्थिती
एकूण चाचणी १७६०४
निगेटिव्ह ११,६४३
रुग्ण संख्या ५,०७२
कोरोनामुक्त ३,००१
उपचार सुरू १,८९४
एकूण मृत्यू १७७
होम क्वारंटाईन ११,३०४
क्वारंटाईन पूण ३९,४३१

Web Title: CoronaVirus News : Will Abhijeet win over Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.