CoronaVirus: दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 08:33 PM2020-04-03T20:33:00+5:302020-04-03T20:33:46+5:30

या 11 जणांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय (कोविड रुग्णालयात ) ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्रशासन प्राप्त होणार आहेत.

CoronaVirus: Nine people from Panvel participated in the Nizamuddin program in Delhi vrd | CoronaVirus: दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग 

CoronaVirus: दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग 

Next

पनवेल: दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या 2 जण देखील दिल्ली कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या 11 जणांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय (कोविड रुग्णालयात ) ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्रशासन प्राप्त होणार आहेत.

मरकजच्या 11 जणांसह अन्य 11 अशा एकूण 22 जणांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देखरेखीखाली पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने देशभरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. पनवेलहून 9 जणांचा संबंध या कार्यक्रमाशी आला होता. तर दोन प्रवासी त्यांच्या संपर्कात आल्याने ते 11 तर कोरोनाशी निगड़ीत असल्याच्या संशयावरून अन्य 11 अशा 22 जणांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या ‘कोविड-19’ दालनात ठेवले आहेत.

Web Title: CoronaVirus: Nine people from Panvel participated in the Nizamuddin program in Delhi vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.