पनवेल: दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग होता. याव्यतिरिक्त या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या 2 जण देखील दिल्ली कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या 11 जणांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय (कोविड रुग्णालयात ) ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे कोरोना अहवाल रात्री उशिरापर्यंत प्रशासन प्राप्त होणार आहेत.मरकजच्या 11 जणांसह अन्य 11 अशा एकूण 22 जणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखरेखीखाली पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. दिल्लीतील निझामुद्दीन येथे मरकजच्या धार्मिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने देशभरातील नागरिकांनी हजेरी लावली होती. पनवेलहून 9 जणांचा संबंध या कार्यक्रमाशी आला होता. तर दोन प्रवासी त्यांच्या संपर्कात आल्याने ते 11 तर कोरोनाशी निगड़ीत असल्याच्या संशयावरून अन्य 11 अशा 22 जणांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या ‘कोविड-19’ दालनात ठेवले आहेत.
CoronaVirus: दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात पनवेलच्या 9 जणांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 8:33 PM