शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Coronavirus: तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना ‘नो एण्ट्री’; प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 2:08 AM

तळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे.

वैभव गायकर 

पनवेल : नवी मुंबईमधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेशबंदीचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासन सतर्क झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

कारागृहाची क्षमता २१२४ एवढी आहे. सध्याच्या घडीला २७०० पर्यंत कैदी असून, यात अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेमचाही समावेश आहे. पनवेल परिसरातही कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. विशेष म्हणजे, कैद्यांच्या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या आहेत. नव्याने कैद्यांना प्रवेश दिला जात नसून, नव्या कैद्यांची रवानगी थेट खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी २० कैद्यांना ठेवण्यात आले आहे. अत्यावश्यक वेळेला एखाद्या कैद्याला कारागृहात ठेवण्याची वेळ आल्यास त्याची कोविड १९ चाचणी करूनच कारागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे कुर्लेकर यांनी या वेळी स्पष्ट केले. तळोजा कारागृहात यापूर्वीच क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत.नव्या कैद्यांची रवानगी थेट विलगीकरण केंद्राततळोजा कारागृहात नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला असून, नवीन कैदी आल्यास त्याची रवानगी खारघर शहरात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात करण्यात येत आहे. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाने ही सावधगिरीची भूमिका घेतली आहे.तळोजा कारागृहात सध्याच्या घडीला नवीन कैद्यांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारघर शहरात एक विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. नव्या कैद्यांना या ठिकाणी ठेवले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. - कौस्तुभ कुर्लेकर. अधीक्षक , तळोजा मध्यवर्ती कारागृह

टॅग्स :PrisonतुरुंगCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस