coronavirus : पनवेलमध्ये रस्त्यावर शुकशुकाट; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:43 AM2020-03-25T11:43:11+5:302020-03-25T11:45:03+5:30
पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड तसेच सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहावयास मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.
- वैभव गायकर
पनवेल - पंतप्रधान मोदी यांनी मंगळावर मध्यरात्री पासुन संपूर्ण देशात लॉकडाऊन ची घोषणा केल्यांनतर पनवेल शहरातील रस्ते ,महामार्ग ,एसटी स्टॅन्ड तसेच सर्वत्र बुधवारी सकाळ पासुन शुकशुकाट पहावयास मिळाला .मात्र जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी नागरिकांनी किराणा दुकाने ,कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.
जनता कर्फ्यूच्या नंतर जमाव बंदी झुगारून मोठ्या संख्येने नागरिक ,खाजगी वाहन चालक रस्त्यावर उतरले होते.कामोठे शहरात जमाव बंदीचा उल्लंघन केल्याप्रकरणी एक गुन्हाही दाखल करण्यात आला असताना.पंतप्रधान मोदींच्या अवाहनाला प्रतिसाद देत शहरात शुकशुकाट पसरला आहे.विशेषतः सायन पनवेल महामार्ग , मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ,मुंबई गोवा महामार्ग ,कळंबोली जेएनपीटी ,कळंबोली मुंब्रा महामार्ग ओस पडल्याचे दिसून आले .जीवनावश्यक वस्तूंची वाहने वगळता महामार्ग ओस पडल्याचे दिसून आपले .
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांनी बाजी,फळे तसेच कडधान्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.जीवनावश्यक वस्तू मध्ये मोडल्या जाणाऱ्या या वस्तु खरेदी विक्री करन्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मात्र यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजनांचा आभाव याठिकाणी दिसून आला.या बाजारपेठेत पनवेल ग्रामीण भागासह पेण ,उरण तसेच पुणे आदी ठिकाणाहून माल येत असतो.अशावेळी बाराजपेठ प्रशासनाने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.मात्र तसे होताना याठिकाणी दिसत नाही.