coronavirus: नवी मुंबईत एक लाख ४१ हजारांचा दंड वसूल, बेलापूर विभागातून सर्वाधिक ३९ हजार रुपयांची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 12:44 AM2020-07-11T00:44:22+5:302020-07-11T00:44:45+5:30
महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
प्रत्येक नोडमध्ये कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १ लाख ४१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वाधिक ३९ हजार रुपये दंड बेलापूर विभागातून वसूल केला आहे. घणसोली व ऐरोलीमधून प्रत्येकी ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घराबाहेर पडणे टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.
पनवेलमध्ये ७,२४३ जणांवर कारवाई
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ३ ते १३ जुलैदरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाºया ७,२४३ जणांवर पनवेलमध्ये सात दिवसांत ही कारवाई कारण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सुमारे ३,८५४ केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, असे परिमंडळ २चे उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त पालिका हद्दीतही पनवेल महानगरपालिका प्रशासनाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ३३ हजारांचा दंड पालिकेने वसूल केला.
यांच्यावर बसला वचक
अनावश्यक बाहेर फिरणे-६४१, मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे- ४२६, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- १५, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर फिरणे- १,६०४, मॉर्निंग वॉक- २४९, दुकाने वेळेत बंद न करणे- १०१, आरोग्यविषयक खबरदारी न घेता दुकाने सुरू ठेवणे- २५, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जमणे- १, जास्त प्रवासी वाहतूक- २३६.