coronavirus: विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:48 AM2020-09-04T07:48:59+5:302020-09-04T07:49:22+5:30
पालिका मुख्यालयातच म्हात्रे यांची अँटिजेन टेस्ट आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सल्ल्याने केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचा कोविड १९ चाचणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. पालिका मुख्यालयातच म्हात्रे यांची अँटिजेन टेस्ट आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या सल्ल्याने केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुले यांचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रीतम म्हात्रे यांच्यासह कुटुंबीयांची प्रकृती उत्तम आहे. म्हात्रे कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थायी समिती सभा गुरुवारी पार पडली. या सभेला म्हात्रे यांनी उपस्थिती
लावली होती.
लॉकडाऊनच्या काळात प्रीतम म्हात्रे यांनी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला होता. या वेळी उपविभागीय कार्यालयाने त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मानित
केले होते.