नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामधील रुग्णालयामध्ये बुधवारपासून गॅसपाइपलाइनद्वारे आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ४८३ बेडला ही यंत्रणा बसविली जाणार असून, तेथे ७५ आयसीयू युनिटही सुरू केली जाणार आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,१८३ बेड्स क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामध्ये ४८३ आॅक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून आॅक्सिजन सिलिंडरद्वारे पुरवठा केला जात होता. मात्र, यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना आॅक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा, या ठिकाणी आॅक्सिजन पुरवठ्यासाठी पाइपलाइन बसविण्यात आली आहे. त्यासाठी लिक्विड आॅक्सिजन प्लान्ट उभारला आहे. त्याचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असून, आज आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या सर्व कामांची पाहणी केली. बुधवारपासून हा आॅक्सिजन प्लांट कार्यान्वित होऊन याद्वारे रुग्णांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ७५ आयसीयू बेड्सची व्यवस्था के ली आहे, सानपाडा येथील एमजीएम रुग्णालयातही ७५ आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन आयुक्तांनी कामांची पाहणी केली. साधारणत: १० ते १५ दिवसांमध्ये १५0 आयसीयू बेड्स रुग्णांसाठी उपलब्ध होतील, असे आयुक्तांनी सांगितले.रुग्णांशी नवी मुंबई पालिका आयुक्तांनी साधला संवादसिडको एक्झिबिशन सेंटर पाहणी दौऱ्याप्रसंगी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पब्लिक अॅड्रस सीस्टिमवरून रुग्णांशी थेट सुसंवाद साधला.यामध्ये त्यांनी त्या ठिकाणची आरोग्य तपासणी, तसेच देण्यात येणाºया जेवण आणि इतर सुविधांबाबत रुग्णांना विचारणा केली,तेव्हा सर्व रुग्णांनी हात उंचावून, टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि महानगरपालिकेची व्यवस्था चांगली असल्याचे अभिप्राय व्यक्त केले.
coronavirus: रुग्णालयात गॅसपाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा, वाशीत ४८३ ऑक्सिजन बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 12:40 AM