रायगड जिल्हा ऑरेंज असला तरीही पनवेल पालिका क्षेत्र रेडझोनमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 07:47 PM2020-05-02T19:47:38+5:302020-05-02T19:49:01+5:30

रायगड जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमता 

CoronaVirus in Panvel municipal area is in red zone hrb | रायगड जिल्हा ऑरेंज असला तरीही पनवेल पालिका क्षेत्र रेडझोनमध्येच

रायगड जिल्हा ऑरेंज असला तरीही पनवेल पालिका क्षेत्र रेडझोनमध्येच

googlenewsNext

- वैभव गायकर,

पनवेल : सध्याच्या घडीला केंद्रसरकारने जिल्हानिहाय झोन तयार केले आहेत. यामधील रेड झोन मधील जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात येतो रायगड जिल्ह्याला ऑरेंज झोन मध्ये  पनवेल पालिका क्षेत्रात रेड झोनची नियमावली कायम असणार आहे. 

        पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्णांचा आकडा ९० पर्यंत पोहचला आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे १२  सहभागी केल्यास एकट्या पनवेल तालुक्यात बाधितांचा आकडा १०० पेक्षा जात असल्याने पनवेल मध्ये रेड झोनचे निर्बंध असणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.पनवेल तालुका रायगड जिल्ह्यात येत असल्याने रायगड जिल्ह्याचा सहभाग ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल मधील निर्बंध शिथिल होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

सोशल मीडियावर अशाप्रकारच्या अफवांना देखील मोठ्या प्रमाणार पेव फुटले आहेत. परिस्थितीत पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता यापूर्वीच पोलीस प्रशासनाने पनवेल सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पनवेल मध्ये खारघर,नवीन पनवेल , कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत एकट्या पनवेल मध्ये ९० टक्के कोविड १९ चे रुग्ण आढळल्याने पनवेलकरांसाठी रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत.आजच्या घडीला शेकडो नागरिकांचे कोविड चे नमुने प्रतीक्षेत असल्याने दुर्दैवाने पनवेल परिसरात रुग्णांची वाढ होण्याची शक्यता आहे.याकरिता प्रशासनाने सतर्कता म्हणुन रेड झोनचे निर्बंध कायम ठेवले आहेत. 

      पनवेल परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. हा आकडा सुमारे १५०० पेक्षा जास्त आहे.संबंधित नागरिकांच्या १४ दिवसाच्या होम कोरंटाईन काळावधी २८ दिवस देखील करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात नागरिकांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकराची सूट नसुन नागरिकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये  अवाहन करण्यात आले आहे.

 

रेड झोनमधील नियमावली 

जीवनावश्यक वस्तु व औषध वाहतुकीला परवानगी.ऑटो रिक्षा,खाजगी टॅक्सीसह ओला - उबेरला परवानगी नाही.पास असलेल्या खाजगी वाहनातून दोघांना परवानगी, दुचाकीवर एकाच जनाला परवानगी,विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग, वैद्यकीय उपकरणे,औषध निर्माण व ई कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू तसेच खाजगी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी. 

 

पनवेल परिसरात कोविड च्या रुग्णांची संख्या  झपाट्याने वाढ होत असल्याने याठिकाणी रेड झोनचे निर्बंध गरजेचे आहेत. पनवेल परिसरात रेडझोनचे निर्बंध कायम असणार आहेत.पोलीस आयुक्तांशी देखील यासंदर्भात मी सविस्तर चर्चा करणार आहे. 

-गणेश देशमुख ( आयुक्त , पनवेल महानगर पालिका )

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप

लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...

Web Title: CoronaVirus in Panvel municipal area is in red zone hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.