पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून ३ ते १४ जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण आणि पालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पहिल्या दिवशी ४८४ जणांवर कारवाई केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारी ७३७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.पालिका आयुक्त परिमंडळ २ च्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सुमारे ४०४ केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. भादंवी कलम १८८ अन्वये ८७ गुन्हे दाखल केले आहेत. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशा ४९ जणांवरही यामध्ये कारवाई करण्यात आली आहे.लॉकडाऊनमध्ये मॉर्निंगवॉकला जाणाºया २१ नागरिकांवर यावेळी कारवाई के ली. सामाजिक अंतर न पाळल्याने दोन जणांवर कारवाई तर आस्थापना निश्चित वेळेत बंद न केल्याने पाच दुकानदारांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रवासी वाहतुकीवर निर्बंध असूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केलेल्या १४ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारण नसताना अनावश्यक फिरणाºया ६७ जणांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्तही करण्यात आली.१६ ठिकाणी नाकाबंदीपरिमंडळ २ मध्ये १६ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकूण ७३७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, असे परिमंडळ २ चे उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त पालिका हद्दीतही पनवेल महानगरपालिका प्रशासनाने लॉकडाऊनचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.उरणमध्ये ४०० दुचाकींवर कारवाईउरण : उरण परिसरात लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाºया ४०० दुचाकींवर दंडात्मक कारवाई, तर ५४ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली. उरण वाहतूक शाखा व उरण पोलीस ठाणे यांच्या संयुक्तपणे ६ जुलै रोजी कारवाई करण्यात आली.उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहनही पोलीस, प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने उरण पोलिसांनी दुचाकी स्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. विनाहेल्मेट, मास्क न लावणे, वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, डबलसीट अशा प्रकारच्या वाहनचालकांवर आॅनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संयुक्त कारवाईत एकूण ४०० दुचाकींवर आॅनलाइन दंडात्मक कारवाई, तर ५४ दुचाकी वाहनांवर गुन्हे दाखल करून सदरची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.या कारवाईत उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल आहेर, सहायक पोलीस निरीक्षक व्ही.जी.कावळे, स.पो.नि.वृषाली पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.लॉकडाऊन असतानाही नागरिकांचा सर्रास वावर, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीनवी मुंबई : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या शहरात कोरोनाच्या रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा गाठला आहे, तर अडीचशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ४ जुलैपासून शहरात शंभर टक्के लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र, शहरवासीयांकडून या लॉकडाऊनला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण लॉकडाऊन असतानाही नागरिक सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.नवी मुंबईतील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली विभागात कोरोनाचा चिंतानक प्रादुर्भाव वाढला आहे. या प्रत्येक विभागातील कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. तर संपूर्ण शहरात सोमवारपर्यंत कोरोनाचे ७९५७ रुग्ण सापडले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून नवी मुंबईत दररोज दोनशेच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने २९ जून ते ५ जुलैपर्यंत शहरातील बारा कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन घोषित केला होता, परंतु हा उपाय पुरेसा नसल्याचे लक्षात आल्यानंतर ४ जुलै ते १३ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे, परंतु त्यानंतरही नागरिक बिनधास्त वावर करताना दिसत आहेत. घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरुळ या नोडमधील काही भागांत लॉकडाऊन आहे की, नाही, काहीशी अशीच परिस्थिती दृष्टीस पडत आहे.अंमलबजावणी नाहीलॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पोलीस, पालिकेच्या संबंधित विभागाला दिले आहेत, परंतु शहरवासीयांकडून लॉकडाऊनची गांभीर्याने अंमलबजावणी होताना दिसत नाही.खारघर पोलिसांची जोरदार मोहीमपनवेल : लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे, तसेच पांडवकडा, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज या प्रतिबंधित क्षेत्रात जाणाºयांविरुद्ध खारघर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, त्यांच्यावरगुन्हे दाखल करण्यात आलेआहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी खारघर पोलिसांनी विनाकारण फिरणारे, मॉर्निंग वॉकला जाणारे, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली असून, एकूण ५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तसेच पाच वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रातप्रवेश करु नये असे अवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केलेआहे.
coronavirus: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा, पनवेलमध्ये ७३७ जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 11:57 PM