Coronavirus: कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न; बहु-उद्देशीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 11:29 PM2020-05-03T23:29:22+5:302020-05-03T23:29:33+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्यकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा संपर्क कोरोना रुग्णाशी आला होता. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.

Coronavirus: question of safety of Coronavirus; Corona constraint on multi-purpose employee | Coronavirus: कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न; बहु-उद्देशीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

Coronavirus: कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न; बहु-उद्देशीय कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

Next

नवी मुंबई : कोरोनाच्या संकटात सेवा करणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्यकेंद्रात काम करणाºया बहु-उद्देशीय कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी, २ मे रोजी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने, नागरी आरोग्य केंद्रात काम करणाºया सर्व कर्मचाºयांची नियमित कोरोना तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोना संकटात आरोग्यसेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय, आया, रुग्णवाहिकाचालक, पोलीस, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आदी राज्यातील विविध ठिकाणाचे कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे अशा अनेक कोरोना योद्ध्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्यकेंद्रातील कर्मचाºयांचा संपर्क कोरोना रुग्णाशी आला होता. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल सहा दिवसांनी प्राप्त झाला, यामध्ये एका बहु-उद्देशीय कर्मचाºयाला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. तपासणीनंतर अहवाल प्राप्त होईपर्यंत सहा दिवसांच्या कालावधीत हे कर्मचारी कामानिमित्त एकमेकांच्या संपर्कात आल्याने रविवार, ३ मे रोजी सर्व कर्मचाºयांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागात कार्यरत कोरोना योद्ध्यांची दर आठवड्याला महापालिकेकडून तपासणी करण्यात यावी, तसेच तपासणीचे अहवाल लवकर प्राप्त करून द्यावेत, अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिकेकडे केली आहे.

आरोग्य कर्मचाºयांचे अलगीकरण आवश्यक
कोरोनाबाधित कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांचा अहवाल येईपर्यंत इतर रुग्णांप्रमाणे आरोग्य कर्मचाºयांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य विभागात सेवा देणाºया कर्मचाºयांच्या कुटुंबातील व्यक्ती, लहान मुले, वृद्ध व्यक्तींनादेखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronavirus: question of safety of Coronavirus; Corona constraint on multi-purpose employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.