पनवेल - कोरोना सारख्या घातक विषाणूमुळे राज्यात आणीबाणीची परिस्थितीमुळे राज्यात सर्वत्र तारांबळ उडाली असताना दि.24 मंगळवार रोजी पनवेल तालुक्यात लोड शेडींग केली जाणार असल्याचे मेसेज महावितरणच्या माध्यमातुन ग्राहकांना पाठविण्यात आले होते.मात्र हि लोडशेडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधिकारी माणिक राठोड यांनी दिली. राज्यात कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही .याची खबरदारी घेण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत.संचार बंदीच्या काळात बाहेर पडता येत नसल्याने सध्याच्या घडीला नागरिकांना करमणुकीचे साधन म्हणुन टीव्ही आदिसह विविध इलेकट्रोनिक उपकरणांचा आधार नागरिकांना आहे.अशातच वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल.त्यातच प्रचंड उकाड्यामुळे देखील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.मात्र नागरिकांना आलेल्या मेसेजमुळे घाबरून न झाल्याचे अवाहन महावितरणचे पनवेल मधील अधिकारी माणिक राठोड यांनी केले आहे.31 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची लोडशेडिंग होणार नाही असे राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
coronavirus : लोडशेडिंग पासुन पनवेलकरांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 10:42 AM