CoronaVirus : रुग्ण आढल्याने रस्ते बंद, मार्केट सुरूच, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:15 AM2020-04-27T01:15:41+5:302020-04-27T01:15:59+5:30

मैदानात भरविण्यात येणारे मार्केट सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे.

CoronaVirus : Roads closed due to patient discovery, market continued, social distance thirteen | CoronaVirus : रुग्ण आढल्याने रस्ते बंद, मार्केट सुरूच, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

CoronaVirus : रुग्ण आढल्याने रस्ते बंद, मार्केट सुरूच, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Next

नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला असून सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद करण्यात आले आहेत; परंतु परिसरातील मैदानात भरविण्यात येणारे मार्केट सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे.
कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्यास परिसरातील रस्ते बंद केले जातात. तसेच रुग्ण सापडलेल्या इमारतीच्या आजूबाजूचा सुमारे ५०० मीटरचा परिसर सील केला जातो. तीन दिवसांपूर्वी सानपाडा सेक्टर ९ मधील एका सोसायटीमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत; परंतु सोसायटीच्या काही अंतरावर असलेल्या सेक्टर १० मधील डी. व्ही. पाटील मास्तर मैदानात भाजीपाला, फळे आदी वस्तूंसाठी मार्के$ट सुरू ठेवण्यात आले आहे. याठिकाणी गर्दी होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्केटमध्ये येणाऱ्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही, मास्कही लावले जात नसल्याने संसर्गाचा धोका बळाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या माध्यमातून मार्केट परिसरात कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
>प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
आवश्यक सेवा मिळाव्यात यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे पालन करून दिवसातून काही वेळ मंडई, बाजार सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मंडईमध्ये ग्राहकांना सुविधा देताना काही महिन्यांपूर्वी हद्दपार झालेल्या प्लास्टिक पिशव्या व्यावसायिकांकडून सर्रास उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

Web Title: CoronaVirus : Roads closed due to patient discovery, market continued, social distance thirteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.