CoronaVirus: सुरक्षारक्षकास कोरोना, नवी मुंबईत रुग्णसंख्या ६० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:45 AM2020-04-19T00:45:42+5:302020-04-19T00:46:22+5:30

महापे एमआयडीसी येथे बँकिंग संबंधित कामकाज करणाºया कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत एका व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.

CoronaVirus: Security guard at Corona, Navi Mumbai, at Patient 3 | CoronaVirus: सुरक्षारक्षकास कोरोना, नवी मुंबईत रुग्णसंख्या ६० वर

CoronaVirus: सुरक्षारक्षकास कोरोना, नवी मुंबईत रुग्णसंख्या ६० वर

Next

नवी मुंबई : एमआयडीसीमधील एक कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एकास कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६० झाली आहे.

कोपरखैरणे सेक्टर ८ येथील रहिवासी असलेल्या महापे एमआयडीसी येथे बँकिंग संबंधित कामकाज करणाºया कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत एका व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या कंपनीत चेंबूर येथून येणाºया व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यास कोरोना लागण झाली असावी. सदर कंपनीमार्फत खाजगी लॅबमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये सदर व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून त्याच्या निकटवर्तीय संपर्कात असणाºया ८ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या क्षेत्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असून सदर क्षेत्र कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus: Security guard at Corona, Navi Mumbai, at Patient 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.