CoronaVirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण वाढले; एकूण संख्या ६६ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:08 AM2020-04-20T03:08:45+5:302020-04-20T03:09:11+5:30

घणसोलीत वैद्यकीय अधिकाऱ्याला लागण

CoronaVirus Six more covid 19 patients found in Navi Mumbai takes total toll to 66 | CoronaVirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण वाढले; एकूण संख्या ६६ वर

CoronaVirus: नवी मुंबईमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण वाढले; एकूण संख्या ६६ वर

Next

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये रविवारी सहा नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या ६६ झाली आहे. ठाणे पोलीस दलातील तीन शिपायांना ही लागण झाली आहे. एक वैद्यकीय अधिकारी व रुग्णवाहिकेच्या चालकासही लागण झाली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत ३ पोलीस कॉन्स्टेबलचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामधील ४० वर्षीय कॉन्स्टेबल सेक्टर ९, घणसोली घरौंदा येथील रहिवाशी आहे. तर, २३ वर्षीय आणि २९ वर्षीय अशा दोन कॉन्स्टेबल्सचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे तिघांवरही ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर तिन्ही पोलीस कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातच कार्यरत असूनही नवी मुंबई पालिकेच्या वतीने खबरदारी घेत घणसोली व दिघा येथील परिसराचे निर्जंतुुकीकरण केले.

घणसोली सेक्टर १६ येथील रहिवाशी असलेल्या राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयास कोरोना झाला आहे. नेरूळ सेक्टर २० येथील रहिवाशी असलेले तसेच १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवर मुंबई क्षेत्रात वाहनचालकाची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहेत. रूग्णवाहिकेवर सेवा देताना कोव्हीड बाधीत रुग्णाचा संपर्क आल्याने त्यांस लागण झाली असण्याचा संभव आहे. सानपाडा सेक्टर १९ येथील ६६ वर्षीय महिलेचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. महिलेचा पाय फ्रॅक्चर असल्याने त्या एक महिन्यापासून घरातच होत्या. दरम्यानच्या काळात विविध रुग्णालयात उपचारार्थ त्यांचे जाणे-येणे झाले आहे, त्या दरम्यान प्रवासात वा इतर ठिकाणी लागण झाली असण्याची शक्यता आहे.

Web Title: CoronaVirus Six more covid 19 patients found in Navi Mumbai takes total toll to 66

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.