शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: नवी मुंबईत लहान मुलांचे मृत्यू रोखण्यात यश; दहा वर्षांपर्यंत एकच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:46 AM

तीनशेपेक्षा जास्त कोरोनाबाधित महिलांची सुरक्षित प्रसूती; मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट

- नामदेव मोरेनवी मुंबई : महानगरपालिकेने मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. लहान मुलांचे मृत्यू रोखण्यातही यश मिळविले असून, दहा वर्षांपर्यंत वयोगटांतील फक्त एकच मुलाचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मनपाच्या रुग्णालयात जवळपास साडेतीनशे कोरोनाबाधित महिलांची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात आली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम प्रभावीपणे राबविली आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णांचे प्रमाण वाढले तरी चालेल, परंतु मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जुलैमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त मृत्युदर होता. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर दोन टक्क्यांवर आणण्यात यश मिळविले आहे. प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. शहरात लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. प्रतिदिन दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १० ते १५ जणांना कोरोची लागण होत आहे. मंगळवारपर्यंत या वगोगटात १,७६८ जणांना प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. ११ ते २० या वयोगटांतील २,९०५ जणांना लागण झाली असून, त्यापैकी ५ जणांचाच मृत्यू झाला आहे. लहान मुले व तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्के पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.कोरोना झालेल्या गरोदर महिलांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला आहे. डॉ.राजेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाच डॉक्टरांचे पथक यासाठी कार्यरत आहे. आतापर्यंत ३५०पेक्षा जास्त महिलांची प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. महिला व अर्भकाला नवीन जीवनदान देण्यात आले आहे. आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, त्याही प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर मनपाच्या केंद्रात आल्या होत्या.३,५९५ ज्येष्ठांची कोरोनावर मात : ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे, परंतु नवी मुंबईमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ४,७९० जणांना आतापर्यंत कोरोना झाला असून, त्यापैकी ३,५९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीमध्ये ६८५ ज्येष्ठ नागरिक रुग्णालयात उपचार घेत आहेत.मृत्युदर कमी करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. सद्यस्थितीमध्ये मृत्युदर २ टक्क्यांवर आला आहे. कोरोना झालेल्या गरोदर महिलांनाही योग्य उपचार मिळवून देण्यात येत आहेत.- अभिजीत बांगर, आयुक्त,नवी मुंबई महानगरपालिका९० टक्के तरुण कोरोनामुक्तनवी मुंबईत तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. ४० वर्षे वयोगटापर्यंतचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. ११ ते २० वयोगटांत कोरोनामुक्त होण्याचे सर्वाधिक ९२.३५ टक्के प्रमाण आहे.वयोगटाप्रमाणे कोरोनाबळींची संख्यावयोगट मृत्यू० ते १० १११ ते २० ५२१ ते ३० १७३१ ते ४० ४७४१ ते ५० ९३५१ ते ६० २१५६१ ते ७० २२०७१ ते ८० १३५८१ ते ९० ५३९१ ते १०० २

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या