नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणारे अनेक कर्मचारी नवी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेर वास्तव्यास आहेत. कामानिमित्त त्यांना दररोज प्रवास करावा लागतो. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लॉकडाउन काळात त्यांची निवारा व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात नवी मुंबई शहरात करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नवी मुंबई शेजारील विविध शहरांमध्ये अत्यावश्यक सेवेत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी नवी मुंबई शहरात वास्तव्य करतात. कामानिमित्त ते नवी मुंबई शहरातून इतर शहरांमध्ये प्रवास करतात. यामधील अनेक कर्मचाºयांना मुंबईत कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे कर्मचाºयांचे कुटुंब तसेच संपर्कात आलेल्यांनाही लागण झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरात वास्तव्य करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने लॉकडाउन काळात या कर्मचाºयांची नवी मुंबई शहरातच राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश महापालिका आयुक्त मिसाळ यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.व्हायरल मेसेज चुकीचाकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून मुंबई शहरात ये-जा करण्यासाठी ७ मेपासून प्रतिबंध केल्याच्या जाहीर आवाहनाची फोटो इमेज नवी मुंबई महापालिकेच्या नावाने मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून तात्काळ प्रसिद्धिपत्रक काढून सदर फोटो इमेज महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.