CoronaVirus: नवी मुंबईत तीन रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या ६९
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:08 AM2020-04-21T02:08:53+5:302020-04-21T02:09:12+5:30
तब्बल १,९३० नागरिक क्वारंटाइन
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रात सोमवारी तीन नवीन रुग्ण आढळले. एमआयडीसीमधील खाजगी कंपनीमधील कर्मचारी व डीएकेसीमधील कंत्राटी कामगारास लागण झाल्याने शहरातील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. तर १,९३० जणांना कॉरंटाईन केले आहे.
रबाळे येथील एमआयडीसीतील सँडोज कंपनीत असणाऱ्या ठाणे येथील निवासी इंजिनिअरचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या संपर्कातील इतर ४० व्यक्तींची चाचणी करण्यात आली. सर्वांना कंपनीमार्फत रबाळे येथील हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले होते. त्यापैकी ६ कर्मचाºयाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ कर्मचारी हे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात समुहाने राहत असून सर्वांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचा पत्ता महापालिका क्षेत्रातील असल्याने महापालिकेस सूचित करण्यात आले आहे.
कोपरखैरणे सेक्टर २० येथील २२ वर्षीय तरूणाचे चाचणी पॉझिटिव्ह आली. धीरुभाई अंबानी रिलायन्स लाईफ सायन्स सेंटर रबाळे येथे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असणाºया या तरुणास कोपरखैरणे येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कातील ३ व्यक्तींचे स्वॅब सँपल घेण्यात येत आहेत. सदर व्यक्ती रहिवाशी असलेल्या क्षेत्राचे निजंर्तुकीकरण करण्यात आले असून सदर क्षेत्र कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे.