शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus: कामगारांच्या लोंढ्यांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 2:11 AM

दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली.

- श्याम धुमाळ कसारा : लॉकडाउननंतर राज्यातील मजूर, कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने अनेकांनी पायी गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणारी वाहने, मजुरांमुळे कसारा घाटात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाशिकहून रेल्वे, बसची सोय केली आहे, तुम्ही घरे रिकामी करा, अशी अफवा काही मंडळींनी पसरवली. याला बळी किंवा विश्वास ठेवत मिळेल त्या वाहनाने ही मंडळी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत; पण या लोंढ्यांना कसारा येथील लतिफवाडी, इगतपुरी चेक पोस्ट येथे अडवले जात आहेत. नाशिकहून गाड्या सोडल्या जात आहेत, आम्हाला सोडा, अशी विनवणी हे परप्रांतीय मजूर पोलिसांना करत होते. कामगारांचा हा टाहो पाहून यंत्रणांचे मनही व्यथीत होत आहे.परराज्यातील मजुरांनी काळजी करू नये त्यांची व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगूनही हे मजूर, कामगार आपल्या मूळगावी जाण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. नाशिकहून गाड्या सुटत आहेत, अशी कुणीतरी अफवा पसरवल्याने त्यांना आशेचा किरण दिसू लागला. त्यामुळे ही मंडळी टेम्पो, ट्रक, सायकल रिक्षा प्रसंगी पायी नाशिक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे रविवारी कसारा घाटात वाहतूककोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, परप्रांतीय मजुरांपाठोपाठ आता नांदेड, परभणी, संभाजीनगर, उस्मानाबाद, नागपूरसह अन्य भागात जाणारे मजूर, कामगारांचे लोंढेही बाहेर पडले असून त्यापैकी अनेकांना घरमालकांनी घराबाहेर काढल्याने त्यांच्यापुढे गावाला जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हे कामगार कुटुंबांसह गावाला जात असून त्यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमतर्फे श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या साईधाम ट्रस्ट (करंज पाडा) येथे दुपारी, व रात्रीच्या वेळी निवासाची सोय केली जात आहे.जर केंद्राने काही दिवस दररोज रेल्वेसेवा सुरू केली असती तर आज आम्ही आमच्या गावी सुखरूप पोहोचलो असतो.- मनीषकुमार, कामगार.कोरोनामुळे मोठी आपत्ती ओढवली असून राज्य, केंद्र सरकारही साथ आटोक्यात आणण्यासाठी चांगल्यापद्धतीने प्रयत्न करीत आहेत. आम्हाला आमच्या राज्यात जाण्यासाठी सरकारनेआता आम्हाला थोडी मदत करावी. जेणेकरून आम्ही आमच्या गावाला कुटुंबाकडे पोहोचू.- शिवकुमार दुबे, कामगार.परप्रांतीयांची ठाण्यासह कल्याणकडे पायपीटनवी मुंबई : लॉकडाउनमुळे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय पायी ठाणेसह कल्याणकडे धाव घेऊ लागले आहेत. त्या ठिकाणावरून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वे सुटत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पायपीट सुरू केली आहे.परराज्यातील व्यक्तींना मूळगावी जाण्याला शासनाकडून सवलत मिळाली आहे; परंतु रेल्वेवर अवलंबून असलेल्या बहुतांश परप्रांतीयांना अद्याप प्रवासाचा पास मिळालेला नाही. अशा व्यक्तींकडून जिथून रेल्वे सुटत आहेत, अशा ठिकाणांकडे धाव घेतली जात आहे. त्यामध्ये ठाणे, कल्याण तसेच पनवेल स्थानकाचा समावेश आहे.या स्थानकातून काही करून रेल्वे पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने मुंबईच्या अनेक भागातील परप्रांतीय नवी मुंबईत प्रवेश करत असून रेल्वे रुळावरून अथवा रस्त्याने पायी प्रवासाचा टप्पा गाठत आहेत. तर ठाणे व कल्याणच्या दिशेने जाण्यासाठीदेखील नवी मुंबईतील मार्गांचा वापर होत आहे. अशाच प्रवासादरम्यान तुर्भे स्थानकाच्या आवारात विश्रांतीसाठी थांबणाऱ्यांचे घोळके जमत आहेत.खासगी वाहनाने गाव गाठण्याची ऐपत नसल्याने ते रेल्वेवर अवलंबून आहेत; परंतु त्यांच्या प्रवासाचा मार्ग खुलत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत जिथून रेल्वे सुटतात तिथून त्या पकडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यादरम्यान नवी मुंबईत नाकाबंदीच्या ठिकाणी त्यांना अडवले जात आहे. त्यानंतरही दुसºया मार्गाचा वापर करून इच्छित रेल्वेस्थानक गाठण्यासाठी त्यांची पायपीट सुरूच आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईthaneठाणे