- वैभव गायकरपनवेल : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पनवेलमध्ये संमिश्र पालन होत असल्याचे पाहावयास मिळाले. व्यायामशाळा, नाट्यगृह, तरणतलाव तसेच चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.पनवेल शहरात ७० हून अधिक व्यायामशाळा कार्यरत आहेत. ग्रामीण भागात अनेक व्यायामशाळा आहेत. यापैकी काही व्यायामशाळा शनिवारी सुरूच होत्या. अनेकांना या शासनाच्या नियमाची माहिती नसल्याने व्यायामशाळा सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले. पनवेल शहरातील नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तर तरणतलावदेखील बंदच ठेवण्यात आल्याचे या वेळी निदर्शनास आले.पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना व्हायरस संसर्ग प्रतिबंधाकरिता शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या संसर्गाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील ट्रॅव्हल्स एजन्सींना परदेशात जाणाऱ्या सहली रद्द करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची संख्या घटलीपनवेलनजीक कर्नाळा अभयारण्यात येणाºया पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मुंबई उपनगरातून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र संसर्गाच्या धोक्याने पर्यटक सार्वजनिक ठिकाणे टाळत असल्याने कर्नाळा अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. संबंधित अभयारण्य बंद ठेवण्याबाबत सूचना वरिष्ठांकडून आल्या नसल्याने अभयारण्य सुरू असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. चव्हाण यांनी सांगितले.
Coronavirus :एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट, वर्दळ मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 1:49 AM