शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 2:53 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली आहे; परंतु मार्केटबाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसे न झाल्यास एपीएमसीत प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. व्यापारी, माथाडी कामगार, एपीएमसी कर्मचारी, वाहतूकदारांनाही लागण झाली आहे. यामुळे शासनाने ११ ते १७ मे दरम्यान एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक मार्केटची साफसफाई व निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू असताना मार्केटच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृत व्यापार जोमाने सुरू झाला आहे.कांदा-बटाटा मार्केटच्या बाहेर अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कलजवळील पेट्रोल पंपापर्यंत कांदा, बटाटाचे टेम्पो उभे केले जात आहेत. खरेदीसाठी ग्राहकही गर्दी करू लागले आहेत. अनेक विक्रेते व ग्राहक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एपीएमसीच्या गेटबाहेरील भाजी व फळ विक्रेत्यांना लागण झाली आहे. यामुळे तुर्भे विभाग अधिकारी व पोलिसांनी फळविक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस अनधिकृत व्यवसाय थांबला होता. मात्र, आता मार्केट बंद असल्याने कांदा, बटाटासह फळांचाही अनधिकृत व्यापार सुरू झाला आहे.स्मशानभूमी ते एनएमएमटी डेपोकडील रस्त्यापर्यंत फळांचे टेम्पो उभे केले जात असून तेथेच व्यापार केला जात आहे. एपीएमसीच्या बाहेरील व्यापारावर कारवाई करण्याचा अधिकार एपीएमसी प्रशासनास नाही. यामुळे नवी मुंबई महापालिका व पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही व्यापार सुरू असेल तर पुन्हा कारवाई केली जाईल.- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ-१सर्व उपाययोजनांवर पाणी : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महापालिका व एपीएमसी प्रशासन प्रयत्न करत आहेत. पाचही मार्केटमधील १०० टक्के व्यवहार बंद केले आहेत. आरोग्य शिबिर सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे; परंतु दुसरीकडे मार्केटच्या गेटबाहेरील अनागोंदी कारभार सुरू आहे. रस्त्यावरील अतिक्रमण थांबविले नाही तर कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई