शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Coronavirus Updates: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नवी मुंबईतल्या तरुणाईला फटका; २० ते ४० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 1:24 AM

ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचा धोका कायम

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नवी मुंबईकरांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. २४ दिवसांमध्ये ५,५९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यामध्ये २० ते ४० वयोगटातील २,४५४ जणांचा समावेश आहे. या महिन्यात १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यामध्ये ११ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 

पालिकेचा निष्काळजीपणा व नियम तोडणाऱ्या नागरिकांमुळे नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बुधवारी वर्षभरातील सर्वांत जास्त ५१९ रुग्णांची नोंद झाली आहे. पालिकेला बंद केलेली उपचार केंद्रे पुन्हा सुरू करावी लागली आहेत. दुसरी लाट खूप धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

एक महिन्यात ५,५९६ रुग्ण वाढले असून, त्यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. २० ते ३० वयोगटातील १,१४७ व ३० ते ४० वयोगटातील १,३०७ नवीन रुग्ण वाढले आहेत. नोकरी - व्यवसायासाठी तरुणांना घराबाहेर पडावे लागत आहे. यामुळे तरुणांना धोका वाढत आहे. तरुणाईमध्ये नियम पाळण्याविषयी उदासीनता निदर्शनास येऊ लागली आहे. आम्हाला काही होणार नाही, असे मत अनेक जण व्यक्त करीत असून, मास्कचा वापर करण्याचे टाळत आहेत. हात धुणे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या नियमांचेही पालन केले जात नाही. यामुळे तरुणाईभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

लहान मुलांनाही लागण होत आहे. १० वर्षे वयोगटातील १६४ जणांना लागण झाली आहे. ११ ते २० वयोगटातील ४३८ जणांना लागण झाली आहे. लहान मुलांना घरातील सदस्यांमुळे व बाहेर खेळण्यासाठी गेल्याने लागण होत आहे. महिन्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एका महिन्यात १ ते ३० वयोगटातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ३० ते ५० वयोगटातील ३ जणांचा मृत्यू झाला असून,  ११ जणांत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सहव्याधी असणाऱ्यांत मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. तरुणांनी दक्ष राहावे व  ज्येष्ठांचीही काळजी घेण्याची आवश्यकता  आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या