नवी मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला व्यापाऱ्याचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. सहा दिवसापूर्वी 23 मे रोजी त्यांच्या 27 वर्षांच्या मुलाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 12 मेला वडिलांचेही वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 18 दिवसामध्ये एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे बाजारसमितीमधील सर्वांनाच धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्याच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. नेरूळमध्ये वास्तव्यास असलेल्या या कुटुंबियांचा अनेक वर्षापासून एपीएमसीमध्ये व्यापार आहे. शुक्रवारी निधन झालेले व्यापारी व त्यांची दोन मुले व्यापारामध्ये असून दिवसरात्र परिश्रम करून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊनच्या काळातच त्यांच्या वडिलांचे 12 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कोरोनामुळे अनेक नातेवाईक व परिचितांना अंत्यविधीसाठीही पोहोचता आले नाही.वडिलांच्या मृत्यूचे दु:ख असतानाच व्यापारी व त्यांच्या 27 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना 23 मे रोजी मुलाचे निधन झाले. एपीएमसीमधील सर्वात तरूण व्यवसायिकाचे निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.वडील व मुलाच्या मृत्यूनंतर व्यापारीही रूग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते. अखेर 29 मे रोजी दुपारी उपचारादरम्यान व्यापाऱ्याचाही मृत्यू झाला. एकाच घरातील तिघांचा 18 दिवसांमध्ये मृत्यू झाल्यामुळे बाजार समितीमधील सर्वानाच धक्का बसला आहे. तिघांपैकी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बाजारसमितीमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बाजारसमितीचे अनेक कर्मचारी, सुरक्षा रक्षक, व्यापारी, कामगार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन व्यापारी प्रतिनिधींनीही केले आहे.देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणीहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेशकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट? येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यातमराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार
CoronaVirus News: चिंताजनक! सहा दिवसांपूर्वी मुलगा, आज वडील; एपीएमसीमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 8:09 PM