शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

CoronaVirus: नवी मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन; रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:25 AM

अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली सवलतीचा दुरुपयोग

- नामदेव मोरेनवी मुंबई : जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथ व मोकळ्या जागा व्यापण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. किराणा दुकानदार व अधिकृत भाजी विक्रेत्यांकडूनही सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी दिसू लागले आहे.नेरूळ सेक्टर १६, १८ कडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून २० ते २५ फेरीवाल्यांनी रस्त्यावर भाजी व फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या ठिकाणी सकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. नेरूळ सेक्टर १० परिसरामध्येही फेरीवाल्यांची संख्या वाढली असून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या अतिक्रमणाविषयी समाज माध्यमातून आवाज उठविला आहे. महानगरपालिकेकडेही तक्रार केली आहे. नेरूळप्रमाणे परिस्थिती सीवूड परिसरामध्येही सुरू आहे. सेक्टर ४२ मधील मोअर स्टोअर्सच्या जवळील रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली रस्त्यावर दुकाने सुरू केली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत असून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात इतर ठिकाणीही अशीच स्थिती असून याकडे महानगरपालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.शहरातील अधिकृतपणे व्यवसाय करणाºया दुकानदारांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. सद्य:स्थितीमध्ये मेडिकल, दूध विक्रीची दुकाने, किराणा स्टोअर्स व भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्यांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अनेक दुकानदार मास्कचा वापर करत नाहीत. दुकानदारांनी वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. पण अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवलेले नाही. दुकान मालक व कामगार सॅनिटायझरचा वापरच करत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अस्वच्छतेमुळे व सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन न केल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.दूध डेअरीत नियमांचे उल्लंघनशहरातील प्रत्येक नोडमध्ये डेअरीची छोटी दुकाने आहेत. छोट्या टँकरमधून या डेअरींना दूधपुरवठा केला जातो. दूध घेऊन येणारे कर्मचारी मास्क वापरत नाहीत. हात सॅनिटायझरने धुतले जात नाहीत. डेअरीमध्ये काम करणारे कर्मचारी व दुकानदार सुरक्षेसाठीची काळजी घेत नाहीत.पालिकेच्या सूचनांना हरताळनवी मुंबई महानगरपालिकेने भाजी मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी मार्केट मैदानांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनधिकृत फेरीवाल्यांनी या आदेशाचे उल्लंघन करून रस्ते व पदपथावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या अतिक्रमण करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दक्षता पथकाची पाहणीसाठी गरजमेडिकल, भाजी, फळ विक्रेते, किराणा दुकान, चिकन, मटन विक्रेते, दूध डेअरी व्यवसायांना परवानगी दिली आहे. या अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानदारांकडून नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी दक्षता पथक तयार करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या