डॉक्टर पत्नीपासून पतीला कोरोनाची बाधा; खारघर मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:32 PM2020-04-02T19:32:46+5:302020-04-02T19:37:07+5:30
पनवेल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 9 झाली आहे.
पनवेल : कोरोनाग्रस्त डॉक्टर पत्नीच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोना झाल्याची बाब उघड झाली आहे. दोघेही पती पत्नी खारघर मधील रहिवासी आहेत.सध्याच्या घडीला दोघांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
पनवेल मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 9 झाली आहे.यामध्ये कामोठे मधील 2 ,कळंबोली मधील सीआयएसएफचे जवान असलेले 5 व खारघर मधील दाम्पत्याचा समावेश आहे.खारघर मधील कोरोनाग्रस्त महिला नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात डॉक्टर आहे.या महिलेच्या संपर्कात आल्याने पतीला कोरोनाची लागण झाली.
त्यामुळे संबंधित कोरोनाग्रस्त महिला डॉक्टर कोणाच्या संपर्कात आली आहे का ?याबाबत चौकशी करण्याची गरज आहे.खारघर मध्ये या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बाबतीत उलट सुलट अफवा पसरत असताना आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना अफवांना बळी न पाडण्याचे अवाहन केले आहे.