CoronsVirus News: मुस्लिम मुलावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार; रुग्णालयाने मुलीऐवजी दिला होता मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 08:11 PM2020-05-18T20:11:21+5:302020-05-18T20:26:42+5:30

दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 14 मे रोजी दोन्ही मयत तरुण व तरुणीच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवले होते.

CoronsVirus News: Hindu cremation of a Muslim child mac | CoronsVirus News: मुस्लिम मुलावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार; रुग्णालयाने मुलीऐवजी दिला होता मुलाचा मृतदेह

CoronsVirus News: मुस्लिम मुलावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार; रुग्णालयाने मुलीऐवजी दिला होता मुलाचा मृतदेह

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - वाशीतील पालिका रुग्णलयातून मृतदेह गहाळ झाल्या प्रकरणात मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार झाल्याची बाब समोर आली आहे. रुग्णालयात एकाच ठिकाणी दोन मृतदेह ठेवल्याने हा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे दिघा येथील कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या मृतदेहाऐवजी तरुणाचा मृतदेह हाती लागला असता त्यांनीही अंत्यविधी उरकून टाकला.

उलवे येथील 29 वर्षीय तरुणाचा मृतदेह वाशी रुग्णालयातून गहाळ झाला होता. याप्रकरणी दिवसभराच्या तपासाअंती मृतदेहाची आदळाबद्दल झाल्याची बाब समोर आली आहे. सदर मयत तरुण हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. त्याचा आजारामुळे मृत्यू झाला असता कोरोना चाचणी साठी 9 तारखेला त्याचा मृतदेह वाशीतील पालिका रुग्णालयात आणण्यात आला होता. त्याचदरम्यान दिघा येथील 18 वर्षीय मुलीचा कावीळणे मृत्यू झाल्याने तिचाही मृतदेह चाचणीसाठी रुग्णालयात आणला होता. 

दोघांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 14 मे रोजी दोन्ही मयत तरुण व तरुणीच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलवले होते. परंतु तरुणाच्या घरचे पश्चिम बंगालवरून त्या दिवशी वाशीला पोहचू शकले नाहीत. तर मुलीचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले होते. यावेळी शवागारातील कर्मचाऱ्याने त्यांना मुलीच्या ऐवजी तरुणाचा मृतदेह दाखवून घाईमध्ये तो बंदिस्त करून अंत्यविधीसाठी ताब्यात दिला. दरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनी देखील तो स्वीकारून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो बाहेर न काढता त्याच दिवशी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. 

अखेर चार दिवसांनी त्यांनी स्वतःच्या मुली ऐवजी अनोळखी तरुणाचा अंत्यविधी केल्याचे उघड झाले. उलवे येथील उमर शेख (29) याचा मृतदेह असल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले. उमर याचा मृतदेह व दिघा येथील मुलीचा मृतदेह आजू बाजूला ठेवल्याने हा घोळ झाला. तर उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्याचा भाऊ पालिका रुग्णालयात आला असता, मृतदेह बेपत्ता असल्याचे आढळून आले.

पालिका आयुक्तांनी  या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. त्यांच्याकडून सोमवारी दिवसभर चाललेल्या तपासात हि बाब समोर आल्याचे वाशी पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. तर यामध्ये नेमका हलगर्जीपणा कोणाचा हे तपासले जात असल्याचेही सांगितले. दरम्यान याप्रकरणी अदयाप गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु मुलीच्या बदल्यात मुलाचा मृतदेह बदली झालाच कसा असा प्रश्न मयत उमरच्या भावाने उपस्थित केला आहे.

Web Title: CoronsVirus News: Hindu cremation of a Muslim child mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.