प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पालिकेची कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:47 AM2018-07-22T00:47:39+5:302018-07-22T00:48:05+5:30
३०० किलो साठा जप्त; घणसोली, ऐरोलीसह दिघामध्ये मोहीम
नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली, ऐरोली आणि दिघा विभाग कार्यालयाच्या वतीने या प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात शनिवारी मोहीम राबविण्यात आली. तीन विभागांतून एकूण तीन लाख २० हजारांची रोख दंडात्मक वसुली करण्यात आली.
ऐरोली विभागात ७ पथकामार्फत केलेल्या दंडात्मक कारवाईत एक लाख २० हजार रु पये अशी रोख रक्कम वसुली करण्यात आली. तर ४३ किलो ५०० ग्रॅम प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला, ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ऐरोली विभागाचे सहायक आयुक्त अनंत जाधव, उपअभियंता कल्याण कुलकर्णी, अर्जुन बिराजदार, अजय पाटील आणि स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी ऐरोली परिसरातील १५ ते २० दुकानांवर धडक कारवाई केली. दिघा विभागात एकूण १७ दुकानदारांवर कारवाई करून १५ हजार रुपये रोख अशी दंडात्मक वसुली करण्यात आली असून, दीड किलो प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिघा विभागाच्या सहायक आयुक्त प्रियांका काळसेकर यांच्यासह स्वच्छता अधिकारी, उपअभियंते आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाºयांनी एकूण ४ पथकांमार्फत कारवाई केली.
घणसोलीत विभागात एकूण ३५ दुकानांवर कारवाई करून त्याच्याकडून एक लाख ८५ हजार रु पये रोख एवढी सर्वाधिक दंडात्मक रक्कम वसुली करण्यात आली. तर २५० किलो २०० ग्राम प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. एकूण ४ पथकांमार्फत ही धडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागाचे अधीक्षक धर्मेंद्र गायकवाड, उपअभियंता वसंत पडघन, स्वच्छता निरीक्षक विजेंद्र जाधव यांच्यासह अतिक्र मण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईला उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक धर्मेंद्र गायकवाड यांच्याकडे सायंकाळी ५.३० वाजता काही ग्राहकांच्या आलेल्या तक्रारीवरून घणसोली येथील डी-मार्ट मध्ये तपासणी केली असता त्यांच्याकडून कचºयातील अनावश्यक २०० ग्रॅम प्लॅस्टिक जप्त करून रोख ५ हजार रु पये दंडात्मक रक्कम म्हणून वसुली करण्यात आली.