ग्रहप्रकल्पात २५० लोकांची फसवणूक; सुकापूरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:30 AM2019-07-21T00:30:57+5:302019-07-21T00:31:10+5:30

विकासकावर कारवाईची मागणी। मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

Corruption of 250 planets; | ग्रहप्रकल्पात २५० लोकांची फसवणूक; सुकापूरमधील प्रकार

ग्रहप्रकल्पात २५० लोकांची फसवणूक; सुकापूरमधील प्रकार

Next

नवी मुंबई : पनवेलजवळील सुकापूर येथे घर देण्याच्या नावाने सुमारे २५० लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला त्वरित अटक करून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. शिरीष रंगराव चव्हाण असे या विकासकाचे नाव असून, त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरीष चव्हाण यांनी सुकापूर येथील ८७ गुंठे जमिनीवर प्रस्तावित गृहप्रकल्पातील घरांच्या बुकिंगपोटी २५० ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये उकाळल्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी उजेडात आले होते. या प्रकरणी ग्राहकांनी न्यायालयात दाद मागितली; परंतु विविध कारणे दाखवत विकासकाने ग्राहकांना झुलवत ठेवले. त्यानंतर चव्हाण यांनी प्रस्तावित गृहप्रकल्पाची जमीन श्रवणकुमार जे. अगरवाल आणि विनयकुमार एस. अगरवाल यांना विकली. या जमिनीवर आता टोलेजंग इमारत उभारली जात आहे. मुळात या जमिनीच्या नावाने अगोदरच २५० लोकांची फसवणूक झाली असताना आता त्याच जमिनीवर बेकायदेशीर टॉवर उभारला जात असल्याची बाब महाराष्ट्र ओ.बी.सी. सेनेचे मुख्य संघटक शरद भोवर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. विशेष म्हणजे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कृष्णा मोरे हे मागील अनेक वर्षांपासून या प्रकरणी लढा देत आहेत. त्यांनी पनवेल न्यायालयात विकासक शिरीष चव्हाण यांच्याविरोधात खटलाही दाखल केला आहे; परंतु वेळोवेळी चव्हाण गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारी २०१९ रोजी फरार घोषित केले आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस शिरीष चव्हाण यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भोवर यांनी केला आहे.

सुमारे २५० ग्राहकांची फसवणूक करणारे शिरीष रंगराव चव्हाण यांच्यासह श्रवणकुमार जे. अगरवाल व विनयकुमार एस. अगरवाल यांची सीआयडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शरद भोवर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निविदेनाद्वारे केली आहे.

Web Title: Corruption of 250 planets;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.