शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात 

By वैभव गायकर | Published: September 25, 2022 3:53 PM

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते.

पनवेल: पनवेल महानगराची व्याप्ती वाढत चालली आहे.होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे महत्व वाढले आहे.जिल्ह्यातील सर्वात जास्त महसुल देणारा तालुका,महामार्गाचे वाढते जाळ्यामुळे वाहनांची वाढती वर्दळ,बार संस्कृतीचा वाढता वरचष्मा तसेच सिडको पालिका प्रशासनाचे मोठ मोठे प्रकल्प यामुळे पनवेल मध्ये पोस्टिंग मिळविण्यासाठी मंत्रायलयापर्यंत लॉबींग केली जाते.याचाच परिणाम पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावत चालला असुन आठवडाभरात दोन वेगवगेळ्या प्राधिकरणाचे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.

पनवेल मध्ये दि.20 रोजी महामार्ग सुरक्षा पथक, पनवेल विभागातील पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे यांना एक लाखाची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पथकाने वारे यांना रंगेहात पकडले.दुसरी घटना दि.23 रोजी नवीन पनवेल कार्यालयात सिडको अधिक्षक अभियंतासह माजी सहा कार्यकारी अभियंत्याला 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने हि कारवाई केली.प्रकाश बालकदास मोहिले(57), संजय हरिभाऊ डेकाटे (58) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.या दोन्ही घटनांमुळे पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावत चालला आहे हे प्रकर्षाने समोर आले आहे.यापुर्वी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात महसूल,पोलीस,पालिका,सिडको प्रशासनातील अधिकारी अडकले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात  वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते. पनवेल मधील बार,हॉटेल्स,ढाबे,रेस्टोरंट आदींसह जमिनी खरेदीचे गैरव्यवहार या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात उलाढाल होत असल्याने सर्वानाच पनवेल हवेहवेसे वाटत आहे.पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल देणारा तालुका आहे.यामुळे महसूल विभागातील कर्मचारी अनेक वर्षापासून पनवेल मध्येच थांबत आहेत याकरिता वरिष्ठ पातळीवर लॉबिंग,अर्थपूर्ण व्यवहार देखील होत आहेत.सिडको महामंडळ तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.

नगरविकास विभाग वगळले तर या महामंडळावर कोणाचेच अंकुश नाही.लोकप्रतिनिधी देखील याठिकाणी गुडघे टेकत असल्याने सिडकोच्या विविध विभागात भ्रष्टाचार फोफावत आहे.नवीन पनवेल सिडको कार्यालयातील दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले असल्याने हे याचे उत्तम उदाहरण आहे.पनवेल महानगरपालिकेत वरिष्ठ पदासाठी थेट मंत्रालयातुन लॉबिंग सुरु आहे. पनवेल मधील जवळपास सर्वच विभागाना भ्रष्टचाराने पोखरले आहे.पोलीस,वाहतूक पोलीस, महसूल, सिडको, महामार्ग पोलीस,उत्पादन शुल्क,एमआयडीसी,प्रदूषण महामंडळ आदी प्राधिकरणाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पहावयास मिळत आहे.

पोलीस स्टेशनच्या प्रमुख पदासाठी घोडेबाजार 

पनवेल मध्ये विविध पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पदासाठी एक प्रकारे लिलाव होतो.याकरिता कोटींची बोली लावली जात असल्याची चर्चा आहे.गृह खात्यात वजन वापरून आर्थिक बळाच्या जोरावर पनवेल मध्ये अधिकारी पोस्टवर नियुक्त होत आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारpanvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई