नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:39 AM2021-01-16T00:39:32+5:302021-01-16T00:39:47+5:30

कारवाईची मागणी; बेमुदत उपोषणाचा कुथे बंधुंचा इशारा

Corruption by showing false reason for building a social hall at New Mundhani | नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार

नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागोठणे : नवीन मुंढाणी येथे सामाजिक सभागृह बांधल्याचे खोटे कारण दाखवून भ्रष्टाचार केला आहे. संबंधित भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करावी व अपहारीत रक्कम वसूल होण्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  केशव के. कुथे आणि जनार्दन के. कुथे या दोन बंधुंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पुढील कार्यवाही न झाल्यास २ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे, त्याची प्रत पोलीस अधीक्षक अलिबाग, रायगड जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी, पेण, नागोठणे पोलीस ठाणे, कार्यकारी अभियंता (राजिप), उपअभियंता, पेण, तहसीलदार पेण आणि अलिबाग पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे.

केशव कुथे आणि जनार्दन कुथे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या नवी मुंढाणी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाचे आराखड्यात सामाजिक सभागृह दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने दोन लाख रुपये खर्चाचे काम मंजूर झाले आहे. परंतु सरपंच आणि ठेकेदार यांनी संगनमताने खोटे बिल नोंदवून दोन लाख अपहारीत केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. 

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
nसरपंच आणि ठेकेदार यांनी सामाजिक सभागृह पाडण्यासाठी पंचायत समिती आणि बांधकाम उपविभाग पेण यांची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता, भ्रष्टाचार लपविण्यासाठी सभागृह पाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा निवेदनात आरोप केला असून, संबंधितांवर कारवाई होण्यासाठी २ फेब्रुवारीपासून अलिबागला बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

 

 

Web Title: Corruption by showing false reason for building a social hall at New Mundhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.