दुर्गाडीच्या पायथ्याशी सर्वधर्मीय एकवटले
By admin | Published: November 17, 2016 07:00 AM2016-11-17T07:00:41+5:302016-11-17T07:00:41+5:30
दुगार्डी किल्याच्या पायथ्याशी गणेश घाट परिसरात कल्याणमधील सर्व जाती-धर्म-पंथांचा ‘दिवाळी फराळ व स्नेह मिलनाचा’ कार्यक्रम घेतला.
डोंबिवली : रा.स्व.संघ व त्रिपूर उत्सव मंडळाने गुरुनानक जयंतीनिमित्त त्रिपुरी पौर्णिमेला दुगार्डी किल्याच्या पायथ्याशी गणेश घाट परिसरात कल्याणमधील सर्व जाती-धर्म-पंथांचा ‘दिवाळी फराळ व स्नेह मिलनाचा’ कार्यक्रम घेतला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध जाती-पंथ-संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाली होते.
कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक यांनी भारतमातेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात केली. प्रास्ताविकात त्यांनी सर्वांच्या एकतेची आवश्यकता प्रतिपादित केली. हे एकमेकांच्या प्रेमातून, सहवासातून घडू शकते असे सांगितले. प्रमुख पाहुणे असलेले इतिहास संकलन समितीचे चंदू जोशी यांनी चंद्रकलेवर आधारित हिंदू-मुस्लिम सण उत्सवांची माहिती दिल्ली. धारावीत ऐक्यासाठी झटणाऱ्या महंमद यांची आठवण सर्वांना सांगितली. राष्ट्रीय मुस्लीम मंच कार्यकर्ते जमशेद खान यांनी हिंदू-मुस्लीम एकतेमुळे दुर्गाडी किल्यावरील पोलीस चौकी हटेल तो सुदीन, असे उद््गार काढले व नवीन पिढीच्या कल्याणासाठी एकत्र येण्याचा हा उपक्रम फलदायी होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला कल्याणचे आमदार नरेद्र पवार, शहर संघचालक उमेश कुलकर्णी, महात्मा फुले पोलीस स्टेशन व वाहतुक पोलीस निरीक्षक कार्यालयातील पोलीस आधिकारी, रियाज शेख, रिटा यादव, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)