शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

शैक्षणिक साहित्य खरेदीच्या प्रस्तावांस पालिकेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 1:57 AM

गणवेशासाठी १९ कोटी : लॉकर्ससह बाक खरेदीस १४ कोटींचा खर्च

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी विविध साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना २४ डिसेंबर रोजी झालेल्या तहकूब महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शालेय गणवेशासाठी १९ कोेटी तर विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स आणि बाक खरेदी करण्यासाठी सुमारे १४ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत.

नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून शहरात शाळांच्या प्रशस्त इमारती उभारण्यात आल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबर पूरक पोषण आहार यासारख्या सुविधादेखील देण्यात येतात. २०२०-२१, २०२१-२२ या दोन शैक्षणिक वर्षांकरिता महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, शालेय गणवेश खरेदीसाठी सुमारे १९ कोटी ४० लाख ९७ हजार रुपये खर्च होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने शासनाने केलेल्या सूचनेनुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये लॉकर्स सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी ७३ लाख ५८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये, वर्गखोल्यांमध्ये, तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकदेखील खरेदी करण्यात येणार असून, यासाठी ३ कोटी ६७ लाख ७४ हजार रु पये खर्च केले जाणार आहेत.

या विषयांवर चर्चा करताना नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना जादा तासांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. नगरसेवक प्रशांत पाटील यांनी शाळांमध्ये संगणक शिक्षकांची कमतरता असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. नगरसेविका मोनिका पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून देणे हा प्रस्ताव चांगला असून शहरातील खासगी शाळांनीदेखील याची अंमलबजावणी करावी यासाठी नियमावली तयार करण्याची सूचना केली. नगरसेवक नामदेव भगत यांनी मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येत नाही, तर खाऊचे वाटप कोणत्या आधारावर केले जाते, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक किशोर पाटकर यांनी शहरातील अनेक शाळांमध्ये टॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देताना पालिका शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता याकडेदेखील प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेविका सपना गावडे यांनी महापालिकेच्या काही शाळांमध्ये प्राथमिक सुविधांचीदेखील दुरवस्था झाली असल्याचे सांगत शैक्षणिक वर्षातील सहा महिने संपल्यावर गणवेश देण्यात येतात. या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी केली.विद्यार्थ्यांची अभ्यास सहलच्महापालिकेच्या शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल खोपोली येथील इमॅजिका थीम पार्कयेथे आयोजित करण्यात आली असून, यासाठी ३६ लाख ७४ हजार रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तवाला मंजुरी मिळाली आहे. तसेच इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांची मुंबईतील कीडझेनिया येथील इनडोअर थीम पार्क येथे सहल आयोजित करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ६९ लाख ६३ हजार रु पये खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावालादेखील महासभेची मंजुरी मिळाली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSchoolशाळा