नगरसेवकाची उपायुक्तांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:40 PM2019-12-19T23:40:00+5:302019-12-19T23:40:07+5:30
पनवेलमधील घटना : महापालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
पनवेल : पनवेल शहरातील तहसील कार्यालयाजवळील मोकळ्या भूखंडावर पत्राशेड उभारून दुकाने अनधिकृतरीत्या थाटण्यात आली होती. पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत हे अनधिकृत बांधकाम हटविल्याने नगरसेवक नितीन पाटील यांनी गुरु वारी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या दालनात जाऊन अतिक्रमण हटविल्यामुळे अर्वाच्च भाषेत वर्तणूक केल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केला आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
गुरुवारी साडेअकराच्या सुमारास संबंधित प्रकार घडला. नगरसेवक नितीन पाटील हे अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी सतत पालिका प्रशासनावर दबाव आणत होते. मात्र संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याने पालिकेने संबंधित बांधकाम हटविल्याने नितीन पाटील यांचा तिळपापड झाल्याने त्यांचा हेतू दुखावल्याने यासंदर्भात माझ्या दालनात येऊन दमदाटी शिवीगाळ केल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात पालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांनी आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देऊन या प्रकाराचा निषेध करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यापूर्वीदेखील नितीन पाटील यांनी पालिकेचे अधिकारी चंद्रशेखर खामकर यांना धमकाविल्याचा आरोप आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पालिका कर्मचाºयांना मारहाणीचे प्रकारदेखील घडू शकतात. त्यामुळे कामबंद आंदोलनाचा पवित्रा कर्मचारी, अधिकाºयांनी घेतला आहे.
शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडणार आहे. या महासभेत संबंधित प्रकाराचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
अतिक्र मण हटविताना दुजाभाव केला जात आहे. कारवाई ही सरसकट झाली पाहिजे हीच माझी मागणी आहे. अनेक वेळा तक्र ारी करूनदेखील अनेक बड्या अनधिकृत बांधकामधारकांना पाठीशी घातले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
- नितीन पाटील, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका