कामे होत नसल्याने नगरसेवक संतप्त; नवी मुंबई मनपा प्रशासनावर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:46 PM2020-02-25T22:46:47+5:302020-02-25T22:46:57+5:30
कामांना गती देण्याचे सभापतींचे आदेश
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या विविध कामांना मंजुरी मिळाली असतानाही कामे करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये करीत नाराजी व्यक्त केली. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना गांभीर्य नसून, चालढकल करीत असल्याचा आरोप करीत मंजूर झालेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
शहरातील विविध प्रभागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. कामे सुरू करण्यासाठी वर्कआॅर्डरही देण्यात आली असून भूमिपूजनही संपन्न झाले आहे; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरु वात झाली नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. या विषयावर चर्चा करताना नगरसेवक सुनील पाटील यांनी नेरु ळ विभागातील रॉक गार्डनच्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली असून उद्यानात सापांचा वावर वाढला असल्याचे सांगितले. सदर भिंतीच्या दुरु स्तीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेविका पूनम पाटील यांनी प्रभागातील विद्युत पोल खराब झाले असून, गाव अंधारात असल्याचे सभेच्या निदर्शनास आणून देत अधिकाºयांकडे पाठपुरावा करून अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. महापालिकेच्या माध्यमातून गावासाठी तीन कमानी बांधण्यात येणार आहेत, या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला असूनही अद्याप कामाला सुरु वात झाली नसल्याचे सांगत, प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी प्रभागात जलकुंभ बांधण्याचे काम व महिन्यांपूर्वी मंजूर झालेले आहे तरी कामाला अद्याप का सुरु वात नाही, असा सवाल केला. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी अग्निशमन दलाच्या जखमी जवानांच्या रु ग्णालयाच्या बिलाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला. सुरेंद्र पाटील यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी अभियंत्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सांगत मंजूर झालेली आणि वर्कआॅर्डर दिलेली जी कामे सुरू झाली नाहीत, ती सर्वच कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. अग्निशमन जवानांच्या रु ग्णालयाचे बिलही भरले जाणार असल्याचे शिरीष आरदवाड यांनी सांगितले.
मेडिकलची असलेला निधी कमी पडल्यास त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणणार असल्याचे आरदवाड म्हणाले. सभापती गवते यांनी अनेक ठिकाणी भूमिपूजन होऊन कामे सुरू झालेली नाहीत. वर्कआॅर्डर दिली जाते; परंतु काम सुरू झाले की नाही, हे पाहायला अधिकाºयांना वेळ नसल्याचे सांगत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. एकमेकांवर चालढकल केली जात असून, सभेचे गांभीर्य नसल्याने उपायुक्त सभेला हजर नसल्याचे त्यांनी सांगितले.